NCP : ‘शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी होती, पण…’, प्रफुल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट
अजित पवार गटाचे कर्जतमध्ये दोन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी व्यासपिठावरून बोलताना खासदार प्रफुल पटेल यांनी खळबळजनक गोष्टी उघड केल्या आहेत.
ADVERTISEMENT
Praful Patel Big Revelation About Sharad Pawar PM Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नेहमीच बोलून दाखवली होती. पण आता शरद पवारांच्या पंतप्रधान पदाच्या संधीबाबत अजित पवार (Ajit Pawar) गटाचे खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी होती, मात्र ही संधी त्यांनी नाकारल्याचा गौप्यस्फोट प्रफुल पटेल यांनी केला आहे. शरद पवार यांनी चालून आलेली ही संधी नेमकी काय होती? आणि या संधीला त्यांनी का नाकारले? हे जाणून घेऊयात. (sharad pawar had a chance to become prime minister but praful patel’s big secret revelation maharashtra politics) or
ADVERTISEMENT
अजित पवार गटाचे कर्जतमध्ये दोन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी व्यासपीठावरून बोलताना खासदार प्रफुल पटेल यांनी खळबळजनक गोष्टी उघड केल्या आहेत.
हे ही वाचा : Exit Poll 2023: लोकसभेची सेमीफायनल, पाहा 5 राज्यांचा Poll of Polls, कोणत्या राज्यात कोणाची सत्ता?
145 पेक्षा जास्त खासदार शरद पवारांच्या घरी आले अन्…
अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे तसेच शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा होती. नरसिंह राव यांना हटवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी राव यांनी सीताराम केसरींना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आलं. त्यानंतर एचडी देवेगौडा पंतप्रधान झाले. पण सीताराम केसरी यांनी देवेगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. 145 पेक्षा जास्त खासदार शरद पवार यांच्या घरी आले. तुम्ही केसरींना हटवा अशी विनंती सर्वांनी केली. त्यावेळी देवेगौडा यांचा मला फोन आला. मी त्यांच्या घरी गेलो. तेव्हा देवेगौडा यांनी मी राजीनामा देतो, पण केसरींना हटवा. शरद पवार यांना भूमिका घ्यायला सांगा असा मला निरोप दिला, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Chhattisgarh Exit Poll 2023: छत्तीसगडचा Poll of Polls, कोणाच्या हातात जाणार सत्ता?
या सर्व घडामोडीनंतर मी तातडीने शरद पवार यांना भेटलो. आपल्याला मोठी संधी आहे. तुम्ही भूमिका घ्या, अशी गळ मी शरद पवार यांना घातली. त्यावर पवार यांनी 15 मिनिटात बैठक संपवून नंतर बोलू असं म्हणत आलेली सुवर्णसंधी घालवल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. त्यावेळी काय झालं हे मला कळालं नाही. पण शरद पवार पंतप्रधान झाले नाहीत. ते पंतप्रधान झाले नाहीत याची खंत माझ्या मनात कायम आहे, असेही प्रफुल पटेल यांनी सांगितले.
ADVERTISEMENT