Ncp ECI : राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह काढून घेतलं जाऊ शकत, पण…; शरद पवारांनी काय सांगितलं?
Maharashtra politics : शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह काढून घेतलं जाऊ शकतं, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी बोलताना केलं आहे.
ADVERTISEMENT
Sharad pawar vs Ajit pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अजित पवार गटाने पक्षावर दावा ठोकला आहे. दुसरीकडे अशीही चर्चा सुरुये की शरद पवार भाजपसोबत जाऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झालाय. शरद पवारांनी कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर केला, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी नाव आणि चिन्हाबद्दल मोठं विधान केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचं केंद्रीय निवडणूक आयोगात गेलं आहे. अजित पवार गटाने पक्षावर दावा ठोकलाय, तर पक्षात अशी कोणतीही फूट पडली नसून आमची राष्ट्रवादी हाच मूळ पक्ष असल्याचा दावा शरद पवारांकडून केला गेला आहे.
शरद पवार भाजपसोबत जाणार?
दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीही भाजपसोबत जाणार अशी कुजबुज गेल्या काही दिवसांपासून सुरु झाली. त्यामुळं पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात पडले. पण स्वतः शरद पवारांनीच यावर खुलासा करत हा गोंधळ दूर केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
शरद पवारांनी कार्यकर्त्यांना काय सांगितलं?
पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी पवारांनी एक भीती बोलून दाखवत भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.
वाचा >> नीलिमा चव्हाणचा नेमका मृत्यू कसा झाला?, पोलिसांनी दिली मोठी माहिती
पवार म्हणाले, “राष्ट्रवादीचे नाव आणि घड्याळ चिन्ह याबद्दल कायदेशीर लढाई सुरू आहे. शिवसेनेसंदर्भात निवडणूक आयोगावर दबाव आणून ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह काढून घेण्यात आले, तसा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या दबावाला घाबरणार नाही.”
ADVERTISEMENT
वाचा >> Nishikant Dubey : ’70 हजार कोटी घोटाळ्यात केस पृथ्वीराज चव्हाणांनी केली’
“राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह नसले, तरी पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणले जाईल. विचारधारेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे भाजपला साथ देण्याचा प्रश्नच येत नाही. लढून नव्याने पुन्हा सर्व काही उभे केले करू”, असा विश्वास पवारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT