Sharad Ponkshe: “बाजीराव पेशवे छत्रपतींची गादीही बळकावू शकले असते पण…”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर असलेला हर हर महादेव हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शित झाला. या सिनेमावर राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. या सिनेमात चुकीचा इतिहास हाताळण्यात आला आहे असाही आरोप होतो आहे. दुसरीकडे अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे ते वादात अडकू शकतात अशी चिन्हं आहेत. बाजीराव पेशवे यांचा उल्लेख करताना शरद पोंक्षे यांनी एक वक्तव्य केलं आहे त्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो.

ADVERTISEMENT

शरद पोंक्षे या व्हीडिओत काय म्हणताना दिसत आहेत?

बाजीराव पेशवे हे वयाच्या २१ व्या वर्षी पेशवे झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला तो ४२ व्या वर्षी. २१ वर्षात बाजीराव पेशवे ४२ लढाया लढले. त्यातली एकही लढाई ते हरले नाहीत. पण बाजीराव पेशव्यांनी कधीही स्वतःला छत्रपती म्हणवून घेतलं नाही. एवढी प्रचंड ताकद, एवढी अफाट बुद्धिमता, एवढी अफाट राजनीती, मुत्सदेगिरी होती. त्यांनी मनात आणलं असतं तर ते छत्रपतींची गादी बळकावू शकले असते. पण त्यांनी असं केलं नाही. अख्खी १०६ वर्षांची पेशवाई ही छत्रपतींच्या गादीचा सेवक म्हणूनच निभावली आहे. असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे.

आपल्याला बाजीराव माहित आहे तो मस्तानीवर प्रेम करणारा हे आपलं दुर्दैव

आपल्याला बाजीराव माहित आहे तो मस्तानीवर प्रेम करणारा हे आपलं दुर्दैव आहे असंही शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे. बाजीराव पेशवे म्हणजे एकही लढाई न हरलेला जगातला एकमेव अपराजित योद्धा आहे तरीही आपण त्यांना मस्तानीसाठी लक्षात ठेवतो असंही शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

शरद पोंक्षे आपल्या व्याख्यानासाठी महाराष्ट्रभर दौरा करत असतात. चित्रीकरणामधून वेळ काढत ते व्याख्यान करतात. यादरम्यानचे काही व्हिडीओ शरद पोंक्षे सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. त्यांनी नुकताच शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचा जो नवा व्हीडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे त्यात बाजीराव पेशवे यांनी ठरवलं असतं तर ते छत्रपतींची गादी हिसकावू शकले असते हे वाक्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT