Narendra Modi Speech : उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे अजूनही खुले आहेत?
उद्धव ठाकरे विरोधकांच्या पाटण्यातील बैठकीलाही गेले. पण, इतकं सगळं सुरू असताना भाजपने उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत का? हा प्रश्न पुढे आला आहे. याच कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण!
ADVERTISEMENT
Maharashtr Political News : उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी भाजप नेत्यांकडून सोडली जात नसल्याचे दररोज दिसतंय. मुद्दा मुंबईतील असो वा महाराष्ट्रातील. मुद्दा हिंदुत्वाचा असो की इतर कुठला. भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. उद्धव ठाकरेंही भाजपसोबत लढण्याची भाषा करताहेत. उद्धव ठाकरे विरोधकांच्या पाटण्यातील बैठकीलाही गेले. पण, इतकं सगळं सुरू असताना भाजपने उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत का? हा प्रश्न पुढे आला आहे. याच कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण!
ADVERTISEMENT
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी विरोधकांच्या सुरू असलेल्या बैठकांवर भाष्य केलं. मोदी म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी यांचा भेटून फोटो काढण्याचा एक कार्यक्रम झाला. या बैठकीत सहभागी झालेल्या पक्षांच्या इतिहास बघितला तर कळेल की, त्या सगळ्यांनी मिळून कमीत कमी 20 लाख कोटींच्या घोटाळ्यांची ग्यारंटी आहेत.”
विरोधकांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच घेरणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी निवडणुकांत विरोधकांना घेरण्याची अजेंडा स्पष्ट केला. 2014 मध्ये भाजपने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरूनच काँग्रेस प्रणित युपीएला घेरलं होतं. आता पुन्हा एकदा भाजप त्याचीच पुनरावृत्ती करण्याच्या तयारी आहेत. कारण मोदींनी कार्यकर्त्यांना यांचे घोटाळे लोकांपर्यंत पोहोचवा असंही सांगितलं.
हे वाचलं का?
शरद पवारांवर टीका, उद्धव ठाकरेंबद्दल मौन
पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनच पाटण्यातील बैठकीला हजर असणाऱ्या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांना लक्ष्य केले. महाराष्ट्रातून या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे नेते गेले होते.
भोपाळमधील कार्यक्रमात मोदींनी लालू प्रसाद यादव, केसीआर यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत सगळ्यांवर घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले. शरद पवारांवर टीका करताना मोदी म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सांगायचं, तर ‘एनसीपी’वरही जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध उत्खनन घोटाळा… यांची यादीही खूप मोठी आहे. या पक्षाच्या घोटाळ्यांचे मीट डाऊन होतच नाही.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> PUNE: बॅगेतून कोयता काढला, तरुणीवर सपासप वार करत सुटला; सदाशिव पेठ हादरली!
“तुम्हाला गांधी कुटुंबातील मुला-मुलींचा विकास करायचा असेल, तर काँग्रेसला मत द्या. तुम्हाला मुलायमसिंह यांच्या मुलाचं भले करायचं, तर समाजवादी पक्षाला मत द्या. जर तुम्हाला लालूंच्या कुटुंबातील मुला-मुलींचं भलं करायचं असेल, तर आरजेडीला मत द्या. तुम्हाला शरद पवारांच्या मुलींचं भले करायचं असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या. तुम्हाला के.चंद्रशेखर राव यांच्या मुलींचं भले करायचं असेल, तर बीआरएसला मत द्या”, असं म्हणत मोदींनी राजकारणातील घराणेशाहीचा मुद्दाही अधोरेखित केला.
ADVERTISEMENT
ठाकरेंबद्दल मोदी काहीच बोलले नाही
विरोधकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची उपस्थिती महत्त्वाची मानली गेली. इतकंच काय आदित्य ठाकरेही या बैठकीला हजर होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बैठकीला असूनही मोदींनी मात्र, बोलणं टाळलं.
हेही वाचा >> NCP चे 70 हजार कोटींचे घोटाळे, सुप्रिया सुळे…, PM मोदींचा शरद पवारांवर पहिला ‘वार’
उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी केल्यापासून भाजपकडून सातत्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जाताहेत. ठाकरेंच्या नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप भाजपकडून केले जात आहे. मुंबई महापालिकेच्या कामांत भ्रष्टाचार झाल्याचे दावे भाजपचे नेते किरीट सोमय्या, आशिष शेलार यांच्यापासून चंद्रशेखर बावनकुळेंपर्यंत अनेक नेत्यांनी केले आहेत.
शिंदेंनी लावली चौकशी, फडणवीसांनी केली घोषणा
बृहन्मुंबई महापालिकेची निवडणूक कधी लागणार, हे अद्याप निश्चित नाही. मात्र, या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेला (UBT) भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरलं आहे. मुंबई महापालिकेच्या कामात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांची चौकशी शिंदे-फडणवीस सरकारने चौकशी लावली आहे.
हेही वाचा >> PM मोदींनी टाकला डाव’! 85 टक्के व्होट बँक असलेले पसमांदा मुस्लिम कोण?
भाजपकडून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या काळात मुंबई महापालिकेच्या कामात कसा भ्रष्टाचार झाला. महाविकास आघाडीच्या काळात कशी वसुली केली गेली, याबद्दल सातत्याने वेगवेगळे दावे केले जात असताना पंतप्रधान मोदींनी मात्र, ठाकरेंचा उल्लेखही केला नाही. सुप्रिया सुळेंचं भले करायचे असेल, तर राष्ट्रवादीला मत द्या, असं मोदी म्हणाले. अगदी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करत असलेल्या केसीआर आणि त्यांच्या मुलीचाही मोदींनी उल्लेख केला. पण, त्यांनी आदित्य ठाकरेंचं भले करायचे असेल, तर ठाकरेंच्या शिवसेनेला मत असं मात्र म्हटलं नाही. त्यामुळे भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने ठाकरेंसाठी दरवाजे अजूनही खुले ठेवलेत का? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT