Maharashtra Budget 2024: थेट कृषी पंपाचं वीज बीलच माफ, विधानसभेआधी शेतकऱ्यांवर सरकार मेहेरनजर!
विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज बील माफ करण्याचा मोठा निर्णय़ घेतला आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Budget 2024: मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांना आता अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला.ज्यामध्ये त्यांनी काही अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या. मात्र, आगामी निवडणुका लक्षात घेत शिंदे सरकारने या अंतरिम बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थकीत वीज बील माफ (waive electricity bill) करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला आहे. (ajit pawar big announcement in budget 2024 waiver of all outstanding electricity bills of farmers agriculture pumps)
ADVERTISEMENT
दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा हा महाराष्ट्रातील तब्बल 44 लाखांहून अधिक कृषी पंपधारक शेतकऱ्यांना होणार आहे.
महाराष्ट्र विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामधील महत्वाची घोषणा म्हणजे सरकारनं शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा राज्यातील 44 लाखाहून अधिक कृषी पंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
हे वाचलं का?
तीन, पाच, साडेसात किंवा त्याहून अधिक हॉर्सपॉवर असलेल्या सर्व विद्युत कृषीपंपाची थकीत वीज बील माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील वीजेची वाढती मागणी विचारात घेता ती कमी करण्यासाठी तसेच भारनियमन टाळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर उर्जा पंप देण्यात येणार असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी यावेळील दिली.
ADVERTISEMENT
याशिवाय 15000 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी मोफत यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देण्यात येईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT