Sharmila Thackeray: '...तर असे एन्काउंटर झाले पाहिजे', राज ठाकरेंच्या पत्नी प्रचंड संतापल्या!

मुंबई तक

ADVERTISEMENT

राज ठाकरेंच्या पत्नी प्रचंड संतापल्या!
राज ठाकरेंच्या पत्नी प्रचंड संतापल्या!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अक्षय शिंदेचा मृत्यू आणि पोलीस चकमक योग्य असल्याचं शर्मिला ठाकरेंचं मत

point

असे एन्काउंटर केले तरच आरोपींना जरब असेल असा शर्मिला ठाकरेंचा दावा

point

शर्मिला ठाकरेंनी जखमी पोलिसांची घेतली भेट

Sharmila Thackeray: ठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाला. पण याच चकमकीत एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला. याच पोलीस कर्मचाऱ्याची आज (25 सप्टेंबर) राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. ज्यानंतर माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरेंनी या सगळ्या घटनेबाबत संताप व्यक्त करत एन्काउंटरचं समर्थन केलं आहे. (akshay shinde encounter was right, this kind of encounter must happen raj thackeray wife sharmila thackeray angry on badlapur case)

'आम्हाला सुरक्षिततेची भावना जर निर्माण व्हायची असेल तर असे एन्काउंटर झाले पाहिजे.' असं म्हणत शर्मिला ठाकरेंनी हे एन्काउंटर योग्यच असल्याचं म्हटलं आहे. पाहा या संपूर्ण घटनेबाबत शर्मिला ठाकरे नेमकं काय म्हणाल्या. 

पाहा 'त्या' एन्काउंटरवर शर्मिला ठाकरे नेमकं काय म्हणाल्या... 

'असे एन्काउंटर झाले पाहिजे'

'मी राज ठाकरेंची बायको म्हणून बोलत नाहीए. मी महिला म्हणून बोलतेय.. मला एक मुलगी आहे. तमाम महिलांच्या बाजूने बोलतेय. आमच्यामध्ये एवढी असुरक्षिततेची भावना झाली आहे.. एवढं हिंस्त्र गुन्हे घडतायेत. राजकारणी काय बोलतायेत, विरोधी पक्ष काय बोलतंय, कोर्ट काय बोलतंय.. मला कोणाशी काही पडलेली नाही.'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Akshay Shinde Encounter : आरोपीला थांबवायला पाहिजे होतं...गोळी का चालवली? हायकोर्टाचा सरकारला संतप्त सवाल

'महिला म्हणून मला अभिमान वाटला म्हणून मी त्या पोलिसांचं कौतुक करतेय. आम्हाला सुरक्षिततेची भावना जर निर्माण व्हायची असेल तर असे एन्काउंटर झाले पाहिजे.' असं शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाल्या.

'महिलांवर अत्याचार होतात ते लोकशाहीला पूरक आहे का?'

'पुरावे वैगरे मला माहिती नाही. पण मी टीव्हीवर पाहिलं की, उज्ज्वल निकम साहेब म्हणाले की, कोर्टाकडे आणि पोलिसांकडे त्याचे सर्व पुरावे आहेत. त्या दोन लहान मुलींनी त्याला ओळखलं आहे. त्यांनी भरपूर उदाहरणं दिली की, पोलिसांनी अनेक पुरावे आहेत. असं होऊच शकत नाही की, त्याच्याविरोधात पुरावेच नाहीत.' 

ADVERTISEMENT

'पण कोर्ट केस जेवढा वेळ चालते ना तेवढा वेळ महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना जास्त निर्माण होते. आज दिल्लीच्या घटनेत सहा वर्षाने आरोपींना फाशी झाली. आपण शक्ती कायदा फक्त बोलतो.. आम्हाला हा शक्ती कायदा पाहिजे. तुम्ही लोकसभेत पास करा, विधानसभेत पास करा.. नका करू.. आम्हाला महिलांना हा शक्ती कायदा अभिप्रेत आहे.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Badlapur News: अक्षय शिंदेचा Encounter 'असा' झाला... वाचा FIR जसाच्या तसा...

'अशा प्रकरणाचे एक-दोन महिन्यातच निकाल लागले पाहिजे. तुम्ही कोर्टात निकाल लावले तर अतिउत्तम आहे. नाही लागले तर मग हे अतिउत्तम आहे.' 

'तुम्हाला असं नाही वाटत का? महिलांवर अत्याचार होतात ते लोकशाहीला मारक आहेत. ते लोकशाहीला पूरक आहेत का? ज्या स्पीडने हे गुन्हे वाढतायेत.. म्हणजे मी गेल्या महिल्या एका दिवशी तीन बलात्कार पीडितांच्या घरी गेले होते. ते लोकशाहीला पूरक आहे असं वाटत असेल तर हे देखील पूरक आहे.' असं विधानही शर्मिला ठाकरेंनी यावेळी केलं. 

'हैदराबाद एन्काउंटरचं कौतुक, तर महाराष्ट्र पोलिसांचं का नाही?' 

'तुम्हा सगळ्यांना आठवत असेल की, हैदराबादला एका मुलीवर बलात्कार झाला होता. त्यावेळी चार बलात्काऱ्यांना हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केलं होतं. तेव्हा हेच विरोधी पक्ष, आता जे सकाळी-सकाळी बोंबलतायेत त्यांच्या वृत्तपत्रात हैदराबादच्या पोलिसांचं कौतुक केलं होतं.' 

'मग हैदराबादच्या पोलिसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातील पोलिसांना वेगळा न्याय असा कसा असू शकतो? जर त्यांचं कौतुक केलं तर यांचं पण कौतुक केलं पाहिजे ना.' असं म्हणत शर्मिला ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे संजय राऊतवर निशाणा साधला.

'तो काही संत नव्हता ना.. तो बलात्कारी होता. मुलींनी त्याला ओळखलंय.' 

'मी या घटनेत जखमी झालेल्या पोलिसांना भेटले. त्यांना सांगितलंय की, सरकार, पोलीस खातं त्यांना कायद्याने संरक्षण देईल, वकील उभे करतील. मी त्यांना सांगितलंय की, आमच्याही पक्षाच्या वकिलांची टीम आहे तुम्हाला लागलं तर आम्हाला सांगा.. आम्ही आमचे वकिलही तुम्हाला देऊ.'  

'मी राज ठाकरेंची बायको आहे.. माझी ही भूमिका आहे. कुठल्या पुरुषाला आवडेल ओ.. की महाराष्ट्रात बलात्कार होत आहेत. मला एक पुरुष दाखवा की, जो म्हणेल अरे वा.. छान होतंय.. कोणालाही हे पटणार नाही. महिलांवर जे अत्याचार चालले आहेत ते कोणालाही पटणार नाही.' 

'आपले कायदे अतिशय तकलादू आहेत. ब्रिटिशकालीन कायदे आहेत. त्या काळात एवढ्या वेगाने गुन्हे घडत नसतील, आता गुन्ह्यांचा वेग वाढला आहे.'

'मी त्यांच्या दु:खात सहभागी होऊ शकते की, त्यांनी त्यांचा मुलगा गमावला आहे. पण त्यांच्या मुलाने जे केलंय त्यात मी सहभागी नाही होऊ शकत.' 

'मला एक व्हॉट्सअॅपवर मेसेज आला आहे तो मी सांगते. 'जर हा एन्काउंटर असेल तर पोलिसांचं अभिनंदन, आणि हा फेक एन्काउंटर असेल तर पोलिसांचं डबल अभिनंदन.' 

'एक महिला म्हणून मी हे बोलते आहे. की, आम्हाला अशा पद्धतीचा न्याय हवा आहे. मी तर असं म्हणते की, अशा प्रकारचे एन्काउंटर झाले तर जे बलात्कारी आहेत त्यांच्यामध्ये दहशत होईल की, नाही आम्ही असं करू शकत नाही इकडे तात्काळ कारवाई होते.' असंही शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाले.  

    follow whatsapp

    ADVERTISEMENT