'आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… एक फैशन हो गया है', अमित शाहांच्या विधानावरुन तुफान राडा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

अमित शाहांच्या विधानावरून तुफान राडा
अमित शाहांच्या विधानावरून तुफान राडा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भीमराव आंबेडकरांच्या नावाचा वापर करणे ही ‘फॅशन’, शाहांचं विधान

point

काँग्रेसने अमित शाहांवर आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप केला

point

काँग्रेसवर अमित शाहांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा भाजपचा आरोप

Amit Shah Controversial statement on Babasaheb Ambedkar: नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्यसभेतील भाषणादरम्यान अमित शाह यांनी आंबेडकरांच्या नावाचा वापर 'फॅशन' म्हणून केला जात असल्याचं म्हटलं आहे. यावर काँग्रेसने शाह यांच्यावर राज्यघटनेच्या निर्मात्याचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. (ambedkar ambedkar ambedkar it has become a fashion bjp leader amit shah statement on babasaheb ambedkar has created a ruckus)

ADVERTISEMENT

तर भाजपने यावरून काँग्रेसवरच टीका सुरू केली आहे. काँग्रेसकडून खालच्या पातळीचं राजकारण सुरू असल्याचं यावेळी भाजपने म्हटलं आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी आंबेडकरांचे छायाचित्र संसदेत नेले आणि शाहा यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. आज (18 डिसेंबर) या संपूर्ण प्रकरणावरून संसदेत मोठा गदारोळ झाला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शाह यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.

हे ही वाचा>> Chhagan Bhujbal : "तुम्ही मला उठ आणि बस सांगणार असाल तर...", छगन भुजबळ संतापले, तुफान बरसले

अमित शाहांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत काल केलं नेमकं विधान?

संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान अमित शाह म्हणाले की, आंबेडकरांचे नाव घेणे ही आजकाल फॅशन झाली आहे. ते म्हणाले, 'आता फॅशन झाली आहे - आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर... एवढं देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्गात गेला असता. त्यांचे नाव आणखी शंभर वेळा घ्या, पण मला जाणून घ्यायचे आहे की तुम्हाला त्यांच्याबद्दल काय भावना आहे?'

हे वाचलं का?

हे ही वाचा>> भाजपने खासदारांना बजावला व्हीप, काँग्रेसनेही... लोकसभेत काय घडतंय?

अमित शाह असंही म्हणाले की, 'जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारशी मतभेद झाल्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला होता. आंबेडकरजींनी अनेकदा सांगितले होते की, अनुसूचित जाती-जमातींना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल ते समाधानी नाहीत. आंबेडकर हे तेव्हाच्या सरकारच्या धोरणांवर आणि कलम 370 बाबतच्या भूमिकेवर खूश नव्हते. तेव्हा त्यांना (मंत्रिमंडळातून) राजीनामा द्यायचा होता, पण त्यावेळी त्यांना काही आश्वासनं देण्यात आली. पण जेव्हा ती आश्वासनं पूर्ण झाली नाहीत तेव्हा बाबासाहेबांनी राजीनामा दिला.' असं म्हणत अमित शाह यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. 

राहुल गांधी आणि खर्गेंनी सोडलं शाहांवर टीकास्त्र

गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने मात्र तिखट प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना जोरदार टोमणा मारला आहे. 'मनुस्मृती पाळणाऱ्यांना साहजिकच आंबेडकरांची अडचण होत असणार.' 

ADVERTISEMENT

तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही शाहांवर निशाणा साधला आणि ते म्हणाले, 'गृहमंत्र्यांनी आज भर सभागृहात बाबासाहेबांचा अपमान केला आहे. त्यांनी हे पुन्हा सिद्ध केलं आहे की, भाजप-आरएसएस हे तिरंग्याच्या विरोधात होते. त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्राला विरोध केला होता. संघ परिवारातील लोकांना पहिल्या दिवसापासून भारताच्या संविधानाऐवजी मनुस्मृतीची अंमलबजावणी करायची होती. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे होऊ दिले नाही, त्यामुळेच त्याच्याबद्दल यांना खूप घृणा आहे.' असं म्हणत खर्गेंनी अमित शाहा आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT