Amit Shah :  ठाकरे-पवारांवर शाहांचा सर्वात मोठा हल्ला! भाजपची विधानसभेची ‘लाईन’ ठरली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

अमित शाहांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा काय केला उल्लेख?
अमित शाह, शरद पवार आणि उद्धव ठाकरे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अमित शाहांचा पुण्यात बोलताना शरद पवारांवर गंभीर आरोप

point

उद्धव ठाकरेंना म्हणाले औरंगजेब फॅन्स क्लबचे नेते

point

महाराष्ट्र भाजपला शाहांनी प्रचाराची लाईन दिली ठरवून?

Amit Shah Maharashtra Vidhan Election : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने राजकीय हल्ले तीव्र होऊ लागले आहेत. महाराष्ट्र भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात पार पडले. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. शाह यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीची महाविकास आघाडीविरोधात प्रचाराची लाईन काय असेल, हे स्पष्ट केले. (Amit Shah accused Sharad Pawar of corruption for the first time. His statement has become a topic of discussion in Maharashtra politics.)

ADVERTISEMENT

अजित पवारांच्या बंडापूर्वी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उल्लेख नॅशनल करप्ट पार्टी अर्थात राष्ट्रीय भ्रष्ट पक्ष असा केला जात होता. मात्र, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सामील झाल्यानंतर भाजपकडून भ्रष्टाचाराचा मुद्दा बाजूला टाकला गेला होता. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून शरद पवारांना लक्ष्य केले जाणार, हे अमित शाह यांच्या भूमिकेनंतर स्पष्ट झाले आहे. 

अमित शाह शरद पवारांबद्दल काय बोलले?

“भ्रष्टाचाऱ्याच्या गोष्टी करताहेत. भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा म्होरक्या भारतीय राजकारणात कुणी असेल, तर ते शरद पवार आहेत. याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचाराला कायदेशीर करण्याचे काम जर कुणी केलं असेल, तर शरद पवार ते तुम्ही केलं आहे. हे मी ठणकावून सांगतो.”

हेही वाचा >> भाजपचा आकडा ठरला? पवार-शिंदे करावा लागणार मोठा त्याग!

अमित शाह यांचे हे विधान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपला शरद पवारांना किंवा त्यांच्या पक्षाला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष्य करता आले नाही. ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अजित पवाराच सोबत असल्याने भाजपची अडचण झाल्याचे दिसले.

हे वाचलं का?

हेही वाचा >> "शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, मग...", फडणवीसांनी घेरलं 

यापूर्वी भाजपने थेट शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले नव्हते. मात्र, यावेळी प्रथमच पवारांना भ्रष्टाचारात खेचण्यात आले आहे. शरद पवारांनी भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचे काम केले, असे सांगत शाहांनी शरद पवारांना भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा म्होरक्या असा उल्लेख केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपकडून याच मुद्द्यावर राष्ट्रवादीला लक्ष्य केले जाणार, हे स्पष्ट दिसत आहे. 

ठाकरेंपासून हिंदुत्ववादी मते दूर ढकलण्याची रणनीती?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना त्यांना औरंगजेब फॅन क्लबचे नेते म्हटले. लोकसभा निवडणूक निकालापासून ठाकरेंना मुस्लिमांचे नेते ठरवण्याचे प्रयत्न भाजपकडून होत असल्याचे दिसत आहे. ठाकरेंचे उमेदवार मुस्लीम मतांवर निवडून आले, असे दावे भाजपच्या नेत्यांनी केले. त्यात आता शाहांनी ठाकरेंबद्दल एक भाष्य करत प्रचाराची लाईन निश्चित केल्याचे दिसत आहे. यातून हिंदुत्ववादी मते ठाकरेंच्या शिवसेनेपासून दूर नेण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

ADVERTISEMENT

अमित शाह उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलले?

“देशाची सुरक्षा औरंगजेब फॅन क्लब सुनिश्चित करू शकत नाही. औरंगजेब फॅन क्लब कोण आहे? आघाडीवाले आहेत. त्यांचा नेता कोण आहे? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले आहेत. तःला बाळासाहेब ठाकरेंचा वारसादार सांगणारे उद्धवजी, कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या लोकांसोबत बसले आहेत. उद्धवजी, याकूब मेननला सोडण्याची मागणी करणाऱ्यांसोबत तुम्ही बसले आहात."

हेही वाचा >> “मी आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्ही...”, प्रसाद लाडांचा जरांगेंना मोठा प्रस्ताव

"झाकीर नाईकला मेसेंजर ऑफ पीस बनवणाऱ्यांच्या मांडीवर उद्धवजी तुम्ही बसला आहात. पीएफआयला पाठिंबा देणाऱ्यांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात. संभाजीनगरचा विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे तुम्ही बसला आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, असे अमित शाह म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT