Chandrayaan-3 : चंद्रावर यान उतरताच शरद पवारांचा मोदींना टोला, म्हणाले…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

chandrayaan 3 successfully land moon ncp sharad pawar reaction
chandrayaan 3 successfully land moon ncp sharad pawar reaction
social share
google news

Sharad Pawar on Chandrayaan Moon landing : भारताच्या चांद्रयान 3 या यानाने यशस्वीरीत्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केली आहे. अशा प्रकारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर पाऊल ठेवणारा चौथा देश आहे. भारतासह देशवासियांसाठी हा ऐतिहासिक आहे. या ऐतिहासिक क्षण संपूर्ण देश साजरा करत आहे. अशात या मोहिमेच्या यशावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे शरद पवार काय म्हणाले हे जाणून घेऊयात. (chandrayaan 3 successfully land moon ncp sharad pawar reaction)

ADVERTISEMENT

चंद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग केली आहे. या लँडिंगवर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोणामुळे आणि त्यांनी निर्माण केलेल्या इस्त्रो सारख्या संस्थेमुळे ही मोहिम यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया शरद पवांरानी दिली आहे. तसेच जवाहरलाल नेहरू यांनी देशातल्या विज्ञानावर लक्ष केंद्रित केले आणि वैज्ञानिकांना प्रोत्साहित केले, या गोष्टीचे आज चीज झाल्याचेही शरद पवार म्हणाले आहे. एकूणच शरद पवार यांनी या मोहिमेचे क्षेय पंतप्रधान मोदींना न देता जवाहरलाल नेहरूंना दिले आहे.

हे ही वाचा : Chandrayaan-3 : हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी खर्च…,चांद्रयान 3 चे बजेट किती?

कधी यश येते, कधी अपयश येते. य़श मिळालं म्हणून जमिनीवरचे पाय या देशाच्या वैज्ञानिकांनी कधी हलवले नाहीत आणि अपयश आले म्हणून कधी नाउमेद झाले नाही, या त्यांच्या अखंड कष्टातून आणि प्रयत्नातून, आज चांद्रयान 3 मिशन यशस्वी झाल्याचे म्हणत शरद पवार यांनी वैज्ञानिकांचे कौतुक केले. तसेच भारतातल्या सर्व वैज्ञानिकांचा मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो,असे देखील शरद पवार म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मला नेहरू सेंटरमध्ये चांद्रयान 3 चं यशस्वी लँडिंग पाहण्याची संधी मिळाली, याची माहिती देखील शरद पवारांनी दिली. तसेच आजचे चांद्रयान मोहीम ही जवाहरलाल नेहरू यांच्या वैज्ञानिक दृष्टकोणामुळे आणि त्यांनी निर्माण केलेल्या इस्रो सारख्या संस्थेमुळे शक्य झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले. जवाहरलाल नेहरू यांनी या देशातल्या विज्ञानावर लक्ष केंद्रित केलं आणि वैज्ञानिकांना प्रोत्साहित केलं त्यामुळे हे शक्य झाल्याचे देखील शरद पवार यांनी सांगितले आहे.विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात कायम आपण अपडेट असलं पाहिजेत हे इस्रोने दाखवुन दिल्याचेही शरद पवार म्हणाले आहेत.

चांद्रयानच्या यशामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचे महत्व नसून, देशातील वैज्ञानिक आणि मेहनत करणाऱ्या लोकांचे कष्ट आहेत, त्यांचे हे खरं  यश आहे, यामध्ये राजकारण न आणता आपण पाहिले पाहिजे असे विधान करून शरद पवार यांनी करून मोदी यांना टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Chandrayaan-3 Landing: चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर कोणतं काम करणार?

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT