'CM साहेब, माझ्या नवऱ्याने तुमच्या पक्षाचं प्रामाणिक काम केलं, आता तुम्हीच...', वाल्मिक कराडच्या पत्नीचं मोठं विधान
Walmik Karad Wife on CM: सीएम साहेब माझ्या नवऱ्याने तुमच्या पक्षाचं प्रामाणिक काम केलं, आता तुम्हीच त्यांना या प्रकरणातून बाहेर काढू शकता असं विधान वाल्मिक कराडच्या पत्नीने मीडियाशी बोलताना केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वाल्मिक कराडच्या पत्नीने थेट मुख्यमंत्र्यांना घातलं गाऱ्हाणं

पतीला फक्त मुख्यमंत्री फडणवीसच बाहेर काढू शकतात असा केला दावा

वाल्मिक कराडच्या पत्नीचं मोठं विधान
बीड: संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केली जात आहे. पण याबाबत आता वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराड हिने एक मोठं विधान केलं आहे. 'CM साहेब, तुमच्या पक्षाचेच लोकं माझ्या पतीला या प्रकरणात अडकवत आहेत. पण माझ्या पतीने तुमच्या पक्षाचे प्रामाणिकपणे काम केलं. त्यामुळे आता तुम्हीचा त्यांना यातून बाहेर काढू शकता.' असं कराडची पत्नी म्हणाली.
वाल्मिक कराडला मकोका लावल्याचं वृत्त समोर येताच परळीतील त्यांचे समर्थक हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट परळी पोलीस स्थानकाबाहेर धरणं धरली आहेत. त्याचवेळी माध्यमांशी बोलताना कराडच्या पतीने सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाल्मिक कराडने निवडणुकीत केलेल्या कामांची आठवणही करून दिली.
हे ही वाचा>> Walmik Karad Wife: वाल्मिक कराडची पत्नी म्हणते, 'महिनाभर आम्ही मरणयातना भोगतोय...'
'हा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही', वाल्मिक कराडची पत्नी मीडियासमोर काय-काय बोलली?
'माझा नवरा हा तुमच्या युतीमध्ये असल्यामुळे सगळ्यांचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आता तुमच्या राजकारणासाठी तुम्ही माझ्या नवऱ्याचा बळी यामध्ये घेऊ नका. तुम्हाला काय करायचं ते राजकारण तुम्ही तिकडे मुंबईमध्ये बसून करा. पण माझ्या नवऱ्याचा याच्याशी काहीच संबंध नाही.'
'त्यांनी प्रामाणिकपणे तुमच्या पक्षाचं काम केलेलं आहे. तुमची माणसं बहुमताने निवडून आणली आहेत. त्याचं फळ म्हणून... आम्ही छोटा समाज असल्यामुळे आज आम्हाला सरकारने दोन मंत्री देखील दिले आहेत. त्याचा तुम्हाला त्रास होत असल्यामुळे तुम्ही सामान्य लोकांना त्रास देत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे. हे बरोबर नाही.. हा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही.'
हे ही वाचा>> Walmik Karad: 'माझ्या छातीत दुखतंय...', मकोका लागताच वाल्मिक कराडच्या छातीत आली कळ
'तुम्ही दुसऱ्यांना म्हणता का माती करतो म्हणून.. पण तुमची सुद्धा माती झाल्याशिवाय राहणार नाही.'
'आम्हाला गुंतवलं जात आहे. हे सगळं थांबायला पाहिजे ही माझी मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे. हे तुमच्या पक्षाचंच आहे. तुमचेच लोकं आहेत हे सगळे. तुमच्याच सगळ्या लोकांचं राजकारण सुरू आहे. माझ्या नवऱ्याने तुमच्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं होतं. तुम्हीच या सगळ्यातून माझ्या नवऱ्याला यातून बाहेर काढू शकता.' असं मंजिरी कराड यावेळी म्हणाली.