'चंद्रशेखर बावनकुळेंनी धस-मुंडे भेट घडवून आणली का?', धनंजय देशमुख थेट म्हणाले, "अत्यंत चुकीच्या पद्धतीनं..."

मुंबई तक

Dhananjay Deshmukh On Chandrashekhar Bawankule : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

ADVERTISEMENT

Dhananjay Deshmukh On Chandrashekhar Bawankule
Dhananjay Deshmukh On Chandrashekhar Bawankule
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुरेश धस यांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची घेतली भेट

point

"बावनकुळे साहेबांविषयी काही बोलायचं..."

point

धनंजय देशमुख नेमकं काय म्हणाले?

Dhananjay Deshmukh On Chandrashekhar Bawankule : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणाला वेगळचं वळण लागल्याचं बोललं जात आहे. या हत्याप्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे सुरेश धस यांनी थेट मुंडेचीच भेट घेतल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. अशातच मस्साजोग मध्ये सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर धनंजय देशमुख यांनी मुंबई तकशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 

मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंबाबत धनंजय देशमुख नेमकं काय म्हणाले?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धसांची भेट धनंजय मुंडे यांच्याशी घडवून आणली होती का, यावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले,"आम्हाला बावनकुळे साहेबांविषयी काही बोलायचं नाही. त्यांना कधीही असं वाटलं नाही, की एवढा सच्चा कार्यकर्ता भाजपचा बुथप्रमुख कार्यरत असताना त्यावेळीही लक्ष नाही दिलं. पण त्याच्या मृत्यूनंतर या लोकांनी काहीतरी वेगळेपण दाखवायला पाहिजे होतं. बुथप्रमुखाचं कशाप्रकारे सांत्वन केलं जाऊ शकतं. त्याला कशाप्रकारे सांभाळू शकले असते.

हे ही वाचा >> Karnataka : ST Bus चालकाला कर्नाटकमध्ये काळं फासत धक्काबुक्की, कोल्हापुरातून कर्नाटकला जाणाऱ्या बस बंद

याविषयी त्यांनी कुठेही विचार न करता अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्यांनी ज्या काही घटना घडवून आणल्या. त्याविषयी खेद आहे. आम्हाला त्यांची नावं घ्यायची इच्छा नाही. कारण अशा घटना घडल्या, त्यातून त्यांनी चुकीचा मेसेज समाजात पसरवलेला आहे. ही घटना जाणीवपूर्वक झाली आहे. त्यांनी या गोष्टीचा उलगडा, ज्या वेळेला केला त्या वेळी केलेला नाही. अयोग्य वेळी केला. ज्यांनी हत्या केलीय, त्यांना लोक समर्थन देत आहेत. या गोष्टीमुळे त्यांना काय साध्य करायचा होतं. हे आम्हाला अजून समजलेलं नाही. आम्ही त्याच्यावर विचार देखील करणार नाहीत. परंतु, त्यांनी केलेलं कृत्य अत्यंत चुकीचं आहे".

हे ही वाचा >> Jalna : पत्र्याच्या आडोशाखाली झोपलेल्या मजूरांवर रात्री वाळूचा ट्रक रिकामा केला, 5 मजूरांचा दबून मृत्यू

"25 तारखेला जे आंदोलन आहे. त्यामध्ये ज्या मागण्या आहेत, पोलीस यंत्रणेने केलेल्या ज्या चुका आहेत, त्या काय म्हणतोय..जर 6 तारखेला पीआय साहेबांनी केस केली असती, तर आमच्या भावाचा जीव राहिला असता. आमचं कुटुंब पोरकं नसतं झालं. आमच्या भावाचा जीव गेला. या सगळ्या लोकांनी आमच्या सर्वांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. परंतु, येणाऱ्या काळात अशा घटना घडल्या नाही पाहिजेत. या सर्वांना आतातरी शिक्षा झाली पाहिजे. यांसर्भातील काही मागण्या आहेत, वकील नेमणे, एसआयटीमध्ये अतिरिक्त अधिकाऱ्यांची नेमणूक असेल, फरार आरोपी कृष्णा आंधळेचा विषय असेल, अशा विविध मागण्या आम्ही त्यांच्याकडे केल्या आहेत", असंही धनंजय देशमुख म्हणाले. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp