NCP: शरद पवारांना मोठा राजकीय धक्का! घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेसही अजित पवारांनाच..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar vs Ajit pawar ncp party and logo
Sharad Pawar vs Ajit pawar ncp party and logo
social share
google news

बातम्या हायलाइट

point

NCP बाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

point

पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे

point

शरद पवारांना मोठा धक्का

NCP Ajit Pawar: नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress) आणि घड्याळ (Watch Logo) हे चिन्ह यापुढे अजित पवार यांच्याकडे असणार आहे. या निर्णयावर निवडणूक आयोगाने आज (6 फेब्रुवारी) शिक्कामोर्तब केलं आहे. ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदेंकडे सोपवलं होतं. त्याच निकषांवर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षही अजित पवारांच्या ताब्यात देण्यात आला आहे. हा निर्णय शरद पवारांसाठी (Sharad Pawar) अत्यंत धक्कदायक मानला जात आहे.  (election commission decision to give ncp party to ajit pawar group on the basis of majority and affidavit big blow to sharad pawar)

ADVERTISEMENT

निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटालाच खरी राष्ट्रवादी असल्याची मान्यता दिली आहे. त्यामुळे अजित पवार गोटात सध्या जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

चिन्ह आणि पक्ष अजित पवारांकडेच

निवडणूक आयोगाकडून या निर्णयाबाबत स्पष्ट करताना म्हटले आहे की, सर्व पुरावे लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी हे ही स्पष्ट करण्यात आले आहे की, 'अजित पवार गटालाच राष्ट्रवादीचे नाव आणि निवडणूक चिन्ह म्हणजे घड्याळ वापरण्याचा अधिकार आहे.'

हे वाचलं का?

शरद पवारांना मोठा धक्का

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्याने राष्ट्रीय अध्यक्ष पद हे ही अजित पवारांकडेच जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयाचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

आश्चर्य वाटलं नाही-आव्हाड 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आता अजित पवार गटाकडे गेल्यानंतर आता याबाबत वेगवेगळी मतं मांडली जात आहे. याचवेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी अजित पवारांसह सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'आम्हाला अपेक्षित असलेला निर्णय मिळाला असल्यामुळे त्याचे काही आश्चर्य वाटणार नाही..' असंही ते यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

बहुमताच्या आधारे निर्णय

अजित पवार गटाकडून आमदारांचे बहुमत आणि प्रतिज्ञापत्र सादर केले गेल्यामुळेच अजित पवार गटाला चिन्ह आणि पक्ष मिळाले असल्याचेही निवडणूक आयागोना सांगितलं आहे. आता याबाबत शरद पवार नेमकी काय प्रतिक्रिया देणार आणि यापुढे ते कोणते राजकीय डावपेच टाकणार याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT