Narhari Zirwal: मंत्रालयात फुल ड्रामा, नरहरी झिरवाळांना थेट जाळीवर का मारली उडी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 मंत्रालयाच्या जाळीवर नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या उड्या
मंत्रालयाच्या जाळीवर नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या उड्या
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मंत्रायलात आमदारांनीच केला तुफान ड्रामा

point

नरहरी झिरवाळांसह काही आमदारांनी मारल्या जाळीवर उड्या

point

आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रालयात आंदोलन

Narhari Zirwal jump Mantralaya: मुंबई: धनगरांनाचा समावेश अनसुचित जमातीमध्ये करू नये यासाठी सत्ताधारी आणि विरोधातील आदिवासी आमदार हे प्रचंड आक्रमक झाले. आज (4 ऑक्टोबर) मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक असताना आदिवासी आमदारांनी थेट मंत्रालयाच्या जाळीवर उड्या घेतल्या. ज्यामुळे पोलिसांची बरीच तारांबळ उडाली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. किरण लहामटे, काशीराम पावरा, हिरामण खोसकर, राजेश पाटील आणि खासदार हेमंत सावरा यांनी जाळीवर उड्या घेतल्या होत्या. (full drama in mantralaya why did narhari zirwal jump directly to the net dhangar reservation vidhansabha election 2024)

ADVERTISEMENT

आतापर्यंत अनेकदा इतर आंदोलकांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मंत्रालयात येऊन जाळ्यांवर उड्या मारून आपलं आंदोलन केलं आहे. पण आता पहिल्यांदाच खुद्द आमदारांनीच जाळ्यांवर उड्या मारून आंदोलन केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हे ही वाचा>> Ladki bahin Yojana: "पुढच्या वेळी 15 लाखांपासून 1500 रुपये...',लाडकी बहीण योजनेबाबत आदित्य ठाकरे काय म्हणाले?

सत्ताधारी आमदारांनी का मारली जाळीवर उडी?  

आदिवासी आरक्षणाबाबत आक्रमक असलेले आमदार नरहरी झिरवाळ हे खरं तर स्वत: सत्ताधारी पक्षात आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटात आहेत. जे सध्या सत्तेत आहेत. असं असतानाही आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांना थेट आंदोलनाचं हत्यार उपसावं लागल्याने आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. 

हे वाचलं का?

कोणकोणते आमदार आलेले मुख्यमंत्र्यांना भेटायला? 

धनगर समाजाचा आदिवासी आरक्षणात समावेश होऊ नये या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदार डॉ. किरण लहामटे देखील आंदोलनात सहभागी होते. याशिवाय सत्ताधारी भाजपचे आमदार काशीराम पावरा आणि खासदार हेमंत सावरा हेही उपस्थित होते. तर काँग्रेस आमदार हिरामण खोसकर आणि बविआचे आमदार राजेश पाटील हे देखील या आंदोलनात होते.

हे ही वाचा>> Mumbai Tak Chavdi: 'त्या पत्रावर सही केली नाही', चावडीवर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, आमदारांनीच जाळीवर उडी मारल्याने मंत्रालयातील सुरक्षा रक्षक आणि पोलिसांमध्ये एकच गोंधळ उडाला. या सर्व आमदारांना बाहेर काढण्यासाठी या सर्वांना बरीच मेहनत करावी लागेल. अखेर सर्व आमदार बाहेर आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या दालनात बोलावलं. 

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही वेळापासून आंदोलन करणारे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या चर्चा सुरू आहे.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT