हरियाणाच्या विधानसभेत फुललं BJP चं कमळ! महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होणार परिणाम?
Haryana Vidhansabha 2024 Result Impact On Maharashtra : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसने सर्वाधिक 48 जागा जिंकून विजयाचा झेंडा फडकवला. त्यामुळे या राज्यात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, हे निश्चित झालं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
हरियाणाच्या विधानसभेच्या निकालामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात होणार मोठे बदल?
जागावाटपाबाबत काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर होणार कमी?
जाणून घ्या महाराष्ट्रातील राजकीय समीकरण
Haryana Vidhansabha 2024 Result Impact On Maharashtra : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसने सर्वाधिक 48 जागा जिंकून विजयाचा झेंडा फडकवला. त्यामुळे या राज्यात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, हे निश्चित झालं आहे. हरियाणात भाजपचा सुफडा साफ करण्यासाठी काँग्रेसने मोठी रणनीती आखली होती. परंतु, भाजपने काँग्रेसचे मनसुबे उधळून टाकत हरियाणाच्या विधानसभेवर गुलाल उधळला. या राज्यात भाजपचा दणदणीत विजय झाल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. (In the Haryana Assembly elections, the Bharatiya Janata Party hoisted the flag of victory winning the most 48 seats. Therefore, it is certain that BJP will form the government for the third time in this state)
ADVERTISEMENT
अशातच महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. पण हरियाणाचा निकाल पाहता राज्यातील भाजपचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्रात काय परिणाम होणार? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे महाराष्ट्रातील भाजपचं मनोबल निश्चितच वाढेल, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तसच महायुतीत भाजपचा बार्गेनिंग पॉवरही वाढेल. तर लोकसभा निवडणुकीत 17 जागा लढवून 13 जागांवर विजय मिळवणाऱ्या काँग्रेसची महाविकास आघाडीच्या जागावाटपात बार्गेनिंग पॉवर कमी होणार आहे. हरियाणात भाजपने सत्तेची हॅट्ट्रिक मारली आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> "मी उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं..."; 'Bigg Boss'च्या घरात गुणरत्न सदावर्तेंनी सांगितली A टू Z स्टोरी
तर नॅशनल कॉफ्रेंन्स-काँग्रेस आघाडीनं जम्मू काश्मीरमध्ये अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा आहे. याठिकाणी मतदारांनी दोन्ही पक्षांना भरघोस मत दिल्यानं त्यांचं पारडं जड झालं आहे. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीत खराब कामिगिरी केल्यामुळे जागावाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीतील घटक पक्षांनी भाजपवर निशाणा साधला होता. आता हरियाणाच्या निकालामुळे भाजपने कमबॅक केल्याचा मेसेज दिला जात आहे.
महाराष्ट्राची राजकीय स्थिती वेगळी
देशपांडे म्हणाले, भाजपच्या नेतृत्त्वात असलेल्या एनडीएच्या महायुतीला सोडून महाविकास आघाडीत जाण्याच्या तयारीत असलेले नेतेही त्यांच्या निर्णयाबद्दल पुर्नविचार करतील. दुसरीकडे काँग्रेसला त्यांचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यासोबत जागावाटपाच्या चर्चेत सक्रिय सहभाग घेता येणार नाही. हरियाणापेक्षा महाराष्ट्रातील राजकीय स्थिती वेगळी आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Bigg Boss 18: "मुंबईवर मी राज करतो, उद्धव ठाकरे आणि शरद पवार..", गुणरत्न सदावर्तेंनी फोडला राजकीय बॉम्ब
उत्तर भागातील राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढाई होती. परंतु, महाराष्ट्रात सहा पक्ष आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी आणि काही छोटे पक्ष राजकीय आखाड्यात समाविष्ट आहेत. हरियाणाच्या मतदानाची तुलना महाराष्ट्रात केली जाऊ शकत नाही. मराठा विरुद्ध ओबीसी आणि धनगर विरुद्ध अनुसूचित जाती, यांसारखे मुद्दे हरियाणात उपस्थित केले जात नाहीत. हे जातीय समीकरण कठीण स्वरुपाचं असून पश्चिम राज्यांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडू शकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT