Exclusive: 'DCM साठी शिंदे कसे झाले तयार, पडद्यामागे काय होतं सुरू...', CM फडणवीसांनी सगळंच सांगितलं!
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री कसे झाले आणि पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडत होत्या याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत नेमकी माहिती दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री कसे झाले?

फडणवीसांनी केला नेमका खुलासा
CM Devendra Fadnavis: मुंबई: तिसऱ्यांदा महाराष्ट्राची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तकशी खास संवाद साधला. विशेष मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली. शेवटी उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना कसं तयार करण्यात आलं आणि बॅक चॅनलमध्ये नेमकं काय-काय सुरू आहे हेही त्यांनी सांगितले. (how did eknath shinde agree to be the deputy cm what were the discussions going on in the back channel devendra fadnavis told openly in exclusive interview)
याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'त्यांच्या (एकनाथ शिंदे) पक्षात दोन मतप्रवाह सुरू होते. शिंदेजींनी महाराष्ट्र सरकारचा भाग व्हावं यावर सर्वसाधारण एकमत होते. पण काही निवडक लोकांचे मत असे होते की, शिंदेजींनी सरकारमध्ये सामील होऊ नये आणि त्यांनी समन्वय समितीचे अध्यक्ष व्हावे.'
हे ही वाचा>> Maharashtra News Live Update 6 Dec 2024: मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची, नाटकबाजी बंद करायची: जरांगे
'पहिल्या बैठकीतच सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय झालेला'
या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की, 'शिंदेजींना सवय आहे की ते लोकांचे म्हणणे अतिशय शांतपणे आणि संयमाने ऐकतात. सगळ्यांशी बातचीत करतात. तिकीट वाटप सुरू असतानाही त्यांची चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच होती. पण सरकारमध्ये सामील होण्याचा त्यांचा निर्णय आमच्या पहिल्या भेटीनंतरच पक्का झाला होता.'
'एकनाथ शिंदेंची पंतप्रधानांशी चर्चा झाली नाही'
फडणवीस म्हणाले, 'पहिल्या बैठकीसाठी आम्ही जेव्हा भेटलो आणि बोललो तेव्हाच त्यांनी निर्णय मान्य केला होता. आमच्या भेटीनंतर शिंदेजी यांची पंतप्रधानांशी कोणतीही चर्चा केली नाही. आधी नक्कीच झाली होती. शिंदे यांनी बैठकीदरम्यान सांगितलं होतं की, पंतप्रधान आणि अमित भाईंना त्यांनी सांगितले होते की, तुमचा नंबर असा आहे की तुम्हाला विचार करावा लागेल.'
हे ही वाचा>> संसदेत राडा... 'या' खासदाराच्या बाकावर सापडलं नोटांचं बंडल, नेमकं प्रकरण काय?
खातेवाटप जवळपास निश्चित
फडणवीस यांना या मुलाखतीत जेव्हा खाते वाटपाबाबत विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, 'चर्चा सुरू आहे. आम्ही खाते वाटपासाठी संख्या जवळपास निश्चित केली आहे.' मात्र, मंत्र्यांची निश्चित संख्या सांगण्यास त्यांनी नकार दिला.
महाराष्ट्रातील जनतेला श्रेय
फडणवीस यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड कशी झाली. 'महाराष्ट्राच्या निवडणुकीत आमच्या आघाडीला निर्णायक विजय मिळाला. याचे संपूर्ण श्रेय महाराष्ट्रातील जनतेला जाते. त्यांनी निर्णायक जनादेश दिला. मात्र आमच्या पहिल्याच सभेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच असेल हे मान्य केले होते.' असं फडणवीस म्हणाले.