Devendra Fadnavis: 'धर्मवीर-3 ची पटकथा मी लिहीन', फडणवीसांच्या 'या' विधानाचा नेमका काय अर्थ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

फडणवीसांच्या 'या' विधानाचा नेमका काय अर्थ?
फडणवीसांच्या 'या' विधानाचा नेमका काय अर्थ?
social share
google news

मुंबई: धर्मवीर-2 हा सिनेमा आज (27 सप्टेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. ज्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, सिनेमा प्रदर्शित होण्याआधी काल (26 सप्टेंबर) एका विशेष स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यासाठी राज्य सरकारमधील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आलं होतं. दरम्यान, याच सिनेमानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं ज्याबाबत आता राजकीय वर्तुळात बरीच चर्चा आहे. (i will write the screenplay of dharmaveer 3 what is the exact meaning of devendra fadnavis statement)

धर्मवीर 2 स्क्रिनिंगनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?

'धर्मवीर 2 याची सगळ्यांना उत्सुकता होती. सगळे लोकं वाट पाहत होते. कधी आपल्याला दुसरा भाग पाहायला मिळतो अशी उत्कंठा देखील होती. एकप्रकारे आज ती उत्कंठा पूर्ण होते आहे. ज्या प्रकारे धर्मवीर 1 ला लोकांनी डोक्यावर घेतलं आणि अतिशय मनापासून लोकांनी सिनेमा पाहिला. तशाच प्रकारे धर्मवीर 2 हे प्रेक्षकांना आवडेल.' 

हे ही वाचा>> Dharmaveer-2 सिनेमाची संपूर्ण कहाणी, शिंदे-ठाकरेंमध्ये तेव्हा नेमकं काय घडलेलं?

'कारण सत्य कथेवर आधारित आणि ज्या लोकांचं जीवन आपण बघितलंय. अनुभवलंय किंवा ऐकलंय अशा चरित्र नायकांच्या संदर्भातील सिनेमा असल्यामुळे सगळ्यांना तो आवडेल.' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'प्रचंड रिसर्च करून छोट्यातील छोटं डिटेल त्या ठिकाणी आणलंय. मी धर्मवीर 2 ला दोनला शुभेच्छा देतो. सगळ्यांनी सिनेमा हॉलमध्ये सिनेमा येऊन पाहावा..' असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, त्यांना पत्रकाराने असा प्रश्न विचारला की, पुढच्या पार्टमध्ये तुमचीही काही भूमिका असेल का? असा एखादा चित्रपट तुम्ही पण काढणार आहात का? 

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड, मंत्रालयात तुफान राडा करणारी ती महिला कोण?

ज्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, 'जो धर्मवीर-3 जो येईल त्याची पटकथा मी लिहीन.'

ADVERTISEMENT

फडणवीसांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय? 

धर्मवीर 2 हा सिनेमा प्रामुख्याने 2022 नंतर राज्यातील ज्या राजकीय उलथापालथी झाल्या त्याच्याशी निगडीत आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं बंड हा भाग प्रामुख्याने आहे. मात्र, जेव्हा राजकीय घडामोडी घडत होत्या तेव्हा एकनाथ शिंदेंसोबतच देवेंद्र फडणवीस हे देखील पडद्याआडून अनेक हालचाली करत होते. 

राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यात शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते प्रमुख भूमिका बजावत होते. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. ज्यानंतर एका नव्या राजकारणाला महाराष्ट्रात सुरुवात झाली

सुरुवातीला देवेंद्र फडणवीस हे या सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार नव्हते. मात्र, भाजपमधील वरिष्ठांच्या आदेशामुळे त्यांना या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हावं लागलं. मात्र, असं असलं तरी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात बरीच धुसफूस सुरू आहे. 

अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी धर्मवीर-3 बाबत जरी गंमतीने विधान केलेलं असलं तरी त्याचे अनेक राजकीय अर्थ हे राजकीय वर्तुळात काढले जात आहेत.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT