Devendra Fadnavis : ‘अजित पवारांना युतीत घेतलं, कारण…’, फडणवीसांनी दिलं उत्तर
Devendra fadnavis interview in India today conclave mumbai 2023 : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राजकीय आघाडी असताना भाजपने अजित पवारांना राजकीय मैत्री केली. अजित पवारांच्या युतीतील एन्ट्रीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. यावर फडणवीसांनी उत्तर दिले.
ADVERTISEMENT
India Today Conclave Mumbai 2023 Devendra Fadnavis Interview : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. पण, सगळ्यांना धक्का बसला तो अजित पवार भाजपसोबत गेल्याने. अजित पवारांना वेगवेगळ्या मुद्द्यावरून भाजपकडून घेरलं जात असताना ही राजकीय घटना घडली. त्यामुळे अजित पवारांच्या महायुतीतील एन्ट्रीमागे राजकारण काय, याबद्दल पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
ADVERTISEMENT
‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह मुंबई २०२३’ मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी बहुमताचं सरकार असताना अजित पवारांना युतीत सामावून घेण्याच्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझी जबाबदारी वाढलीये, असं मी मानत नाही. उलट ती विभागली गेली आहे. राजकारणात तुमची ताकद संघटीत करावी लागते. तिला वाढवावेही लागते.”
हेही वाचा >> OBC Politics Election 2024 : ओबीसी व्होट बँक राजकारणात किती मोठी गेमचेंजर?
याच मुद्द्यावर फडणवीस बोलताना म्हणाले, “इंडिया आघाडीत देशातील विरोध पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करताहेत. मोदीजी नको म्हणून एकत्र येताहेत. अशावेळी भाजपही कुणी सोबत येऊ इच्छित असेल, तर त्याला घेऊ नये, मग हा योग्य निर्णय होणार नाही. अजित पवार आमच्यासोबत येण्यामुळे ताकद वाढते. त्यामुळे आम्ही त्यांना सोबत घेतलं. हे बरोबर आहे की, शिंदेंजी सोबत आल्यामुळे आमचं सरकार बनलं. सरकार चांगलं चाललही होतं. आम्हाला काहीच अडचण नव्हती. पण, ताकद वाढत असेल, तर राजकारणात त्याला नाकारलं जाऊ शकत नाही”, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अजित पवारांच्या आजारावर
‘अजित पवार उपमुख्यमंत्री होऊन तीन महिने झालेत आणि ते दोन वेळा आजारी पडलेत. पूर्वी ते आजारी पडले की, ते बारामतीला जायचे. सगळ्यांना वाटायचं की ते शरद पवारांवर नाराज आहेत. आताही तोच तर्क लावला जात आहे’, या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजकारणात आज परिस्थिती इतकी खराब आहे की आम्ही खरंच आजारी पडलो तरी त्याच्या बातम्या होतात आणि वेगवेगळे मेसेज त्यातून जातात. काल सकाळी मी अजित पवारांनी बोललो, खरंच सांगतो त्यांचा आवाजच निघत नव्हता. इतका त्यांचा आवाज खराब झाला होता. आणि ते म्हणाले मी आज येऊ शकणार नाही. त्यामुळे ते नाही आले. आमचं दिल्लीला जाणं, हे आधीच ठरलेलं होतं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह मुंबई २०२३’ मध्ये बोलताना दिलं.
हेही वाचा >> ‘अजित पवारांना राजकीय आजारपण’, भुजबळांनी सांगितला नेमका कसला त्रास?
दिल्ली दौऱ्याबद्दल फडणवीस म्हणाले…
“आपण संघराज्य पद्धतीत काम करतो. त्यामुळे केंद्रासोबत, केंद्रातील मंत्र्यांसोबत समन्वय ठेवावा लागतो. आणि त्यासाठी दिल्लीला जावं लागतं. त्यामुळे आम्ही दिल्लीला गेलो. हा हे खरंय की, अशा चर्चा ज्यावेळी होतात, तेव्हा पत्रकारांची कल्पनाशक्तीचा नवा आविष्कार बघायला मिळतो आणि आम्हालाही आश्चर्य वाटतं की, कुणी इतका विचार कसा करू शकतं”, असं फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT