Irshalwadi Landslide : ‘गिरीशजी, सीएम आलेत म्हणून…’, अजित पवारांनी सुनावलं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षात जाऊन इर्शाळवाडी दरड दुर्घटनेची माहिती घेतली. पवारांनी गिरीश महाजन यांना कॉल केला. अधिकारी एकनाथ शिंदेंना भेटायला गेल्याचं कळल्यानंतर ते चिडले.
ADVERTISEMENT

irshalwadi landslide news : इर्शाळगडाच्या कुशीत वसलेल्या इर्शाळवाडीवर काळाने झडप घातली. बुधवारी (19 जुलै) रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान, दरड गावावर कोसळली आणि झोपेत असलेले अनेक जीव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदत कार्य सुरू झालं. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर शिंदेंच्या भेटीसाठी अधिकारी इर्शाळवाडीतून खाली आल्याचे कळल्यानंतर अजित पवार चांगलेच चिडले. त्यांना ही नाराजी लपवता आली नाही आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांना अजित पवारांनी सौम्य शब्दात डोस दिला आणि अधिकाऱ्यांना सुनावलं.
इर्शाळवाडी झालेल्या दुर्घटनेची माहिती कळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी आठ वाजताच घडलेल्या ठिकाणीपासून जवळ असलेल्या ठिकाणी पोहोचले. इर्शाळवाडी सोडून काही लोक ज्या ठिकाणी थांबलेत. तिथे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाऊन चौकशी केली.
यावेळी एकनाथ शिंदे यांना अधिकाऱ्यांकडूनही माहिती घेतली आणि मदत व बचाव कार्यासंदर्भात सूचना दिल्या. पण, एकनाथ शिंदे गडाच्या खाली आल्याचे कळल्यानंतर मदत कार्य करत असलेले अधिकारीही खाली आले. हे अजित पवार यांना फोनवरून कळले आणि त्यांनी चांगलंच सुनावलं.
#रायगड जिल्ह्यातील #खालापूर जवळील #इर्शाळगड गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली.
आज पहाटे या गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. सरकार तुमच्या पाठिशी असून तुम्हाला लागेल ते सर्व सहकार्य… pic.twitter.com/z9mkpSWZ6b
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 20, 2023
अजित पवार गिरीश महाजनांना फोनवरून काय बोलले?
“गिरीशजी, तुम्ही स्पॉटवर (दरड कोसळलेल्या इर्शाळवाडी गावात) अगदी पोहोचलात का? कारण प्रांत पण स्पॉटवर आहेत. एनडीआरएफचे लोक आणि तुम्ही वर गेला आहात का, जिथे हे घडलं? प्रांत वगैरे तुमच्याजवळच आहे?”, अशी माहिती अजित पवारांनी घेतली.
वाचा >> Irshalwadi Landslide : …म्हणून इर्शाळवाडीवर कोसळली ‘मड फ्लो’ दरड!
पुढे अजित पवार म्हणाले की, “नाही.. नाही ऐका ना; सीएम आलेत (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) म्हणून खाली जाण्याऐवजी तिथेही लोकांनी काम केलं पाहिजे ना? अहो जायला एक-दीड तास, वर यायला एक-दीड तास… त्यातच तीन तास गेले तर…”, असं म्हणत अजित पवारांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
वाचा >> Irshalwadi Landslide : “आम्ही हाताने माती उकरून लेकरं बाहेर काढली”
अजित पवार पुढे गिरीश महाजनांना म्हणाले, “आता कसं आहे की, आपला प्रयत्न आहे की, चॉपर (हेलिकॉप्टर) घेऊन, जे जखमी आहेत त्यांना त्यातून एअर अॅब्युलन्सने आणता येईल. गिरीशजी, मी नियंत्रण कक्षात आहे. काही अडचण आली, तर मला सांगा म्हणजे मला काही करता येईल”, असं त्यांनी फोनवरूनच गिरीश महाजनांना सांगितलं.