Sushil Kumar Shinde : भाजपची ऑफर की काँग्रेसविरोधात रणनीती! शिंदेंच्या गौप्यस्फोटाचा अर्थ काय?
संघर्षाच्या काळातून जात असलेल्या काँग्रेसमध्ये सुशील कुमार शिंदे पक्षात बाजूला पडले आहे. त्यांना सध्या मुलीचं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याकडे त्यांचा कल दिसत आहे. त्यामुळेच त्यांनी केलेल्या विधानाचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.
ADVERTISEMENT
Sushil Kumar Shinde latest news : “दोन वेळा पराभव झाला तरी मला आणि प्रणिती शिंदेला भाजपने पक्ष प्रवेशाची ऑफर दिली. परंतु आमच्या रक्तात काँग्रेस आहे, त्यामुळे ते शक्य नाही.” हे विधान आहे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे. शिंदे यांच्या विधानाने भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात आणण्याच्या चर्चेला हवा मिळाली. पण, त्याचबरोबर शिंदेंनी हे का सांगितलं आणि आताच हे का जाहीर केलं, या प्रश्नही उपस्थित झाला आहे. भाजपची ऑफर आहे की ऑफरच्या आडून दुसरी राजकीय रणनीती आहे? याचाच अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात…
ADVERTISEMENT
24 मार्च 2019… काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदेंनी एक विधान केलं. ते म्हणाले, “माझ्या मुलीला आणि मला भाजपकडून अनेकदा ऑफर आली होती, मात्र आम्ही भाजपमध्ये गेलो नाही. माझी मुलगी अखेरपर्यंत काँग्रेसमध्येच राहील. तिला भाजपकडून खूप ऑफर आल्या, मात्र ती टिकून राहिली. आम्ही काँग्रेसमध्येच जगू आणि मरू.”
त्यानंतर आता सुशील कुमार शिंदे यांनी पुन्हा भाजपकडून ऑफर आली असल्याचा दावा केला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघनिहाय चर्चा सुरू आहे. उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. अशात सुशील कुमार शिंदे यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडणे साहजिक आहे. पण, शिंदेंनी ऑफर आल्याची वाच्यता का केली, अशी शंकाही उपस्थित होत आहे.
हे वाचलं का?
भाजपची समन्वय समिती
आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून हॅटट्रिक करण्यासाठी भाजपने कंबर कसलीये. बूथपासून ते राज्यपातळीपर्यंत बारीक रणनीतीनुसार काम केलं जात आहे. भाजपने 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचं टार्गेट ठेवलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघात 51 टक्के मते मिळवण्याचं उद्दिष्ट आहे. हे सगळं घडवून आणण्यासाठी भाजपची विरोधी पक्षातील नेत्यांवरही नजर आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपत घेण्यासाठी पक्षाने राष्ट्रीय स्तरावर समिती स्थापन केलीये आणि त्यामुळेच शिंदेंच्या ऑफरच्या विधानाला महत्त्व आलं आहे.
शिंदेंच्या विधानाचा दुसरा अर्थ काय?
संघर्षाच्या काळातून जात असलेल्या काँग्रेसमध्ये सुशील कुमार शिंदे पक्षात बाजूला पडले आहे. त्यांना सध्या मुलीचं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याकडे त्यांचा कल दिसत आहे. याचं कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी केलेलं त्यांचं विधान. “प्रणिती, योग्य उमेदवार आहेत. तिकीट देण्यासाठी हायकमांडशी बोलणार”, असे सुशील कुमार शिंदे म्हणाले. तेव्हापासून शिंदे हे प्रणिती शिंदेंना लोकसभेचं तिकीट मिळावं म्हणून पक्षात लॉबिंग करत असल्याच्या चर्चा सातत्यानं होत आल्या.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> काय आहे खिचडी घोटाळा, ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना का झाली अटक?
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार आहे. सलग दोन वेळा सुशील कुमार शिंदे भाजप उमेदवाराविरोधात पराभूत झाले आहेत. आता प्रणिती शिंदेंना लोकसभेचं तिकीट मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच त्यांनी भाजपकडून ऑफर असल्याचे विधान केले. पण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी हा दावा फेटाळला. त्यामुळे चर्चा आणखी वाढली. याबद्दल असं सांगितलं जात आहे की, प्रणितींना सोलापुरातून तिकीट मिळावं म्हणून पक्षावर दबाव टाकण्याची शिंदेंची रणनीती आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> बाबासाहेबांचा ‘तो’ इशारा! …म्हणून आंबेडकरांनी नाकारलं राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण
काँग्रेसमधील काही नेते भाजपत जाणार, अशी चर्चा होत आहे. त्या नेत्यांची नावे चर्चेत आल्यानंतर त्यांनी हे फेटाळून लावलं. पण, सुशील कुमार शिंदेंनी स्वतःहून ऑफरबद्दलची वाच्यता केली. त्याचा दुसरा अर्थ हे शिंदेंचे दबाब तंत्र आहे, असा लावला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT