MP Election Results: ‘मलाही आशा-आकांक्षा आहेत, पण…’, ज्योतिरादित्य शिंदे असं म्हणाले अन्..

रोहित गोळे

ADVERTISEMENT

MP Election Results: 'मलाही आशा-आकांक्षा आहेत, पण...', ज्योतिरादित्य शिंदे असं म्हणाले अन्..
MP Election Results: 'मलाही आशा-आकांक्षा आहेत, पण...', ज्योतिरादित्य शिंदे असं म्हणाले अन्..
social share
google news

MP Election 2023 Results: भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने अनपेक्षितरित्या अत्यंत मोठा असा विजय मिळवला. यामध्ये त्यांनी काँग्रेसचं अक्षरश: पानिपत केलं आहे. पण आता या विजयानंतर मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण? यावर जोरदार चर्चा सुरू झालेल्या असतानाच मध्य प्रदेशमधील दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक असं विधान केलं आहे ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (madhya pradesh assembly elections 2023 results i also have hopes and aspirations after jyotiraditya scindia
statement a new discussion on the post of chief minister has started in bjp)

ADVERTISEMENT

भाजपच्या या विजयानंतर तुमची राज्यात काय भूमिका असणार? या प्रश्नावर ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, ‘राज्यात मी भूमिका सदैव राज्यात जनसेवकाची राहिली आहे. जरूर माझ्या आशा-आकांक्षा आहेत. पण…’ असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे हे काही क्षण थांबले आणि पुढे म्हणाले की, ‘माझ्या आशा-आकांक्षा या विकासाची आणि प्रगतीची आहे.’

हे ही वाचा>> MP Assembly Election Results 2023: मध्य प्रदेशमध्ये जनतेने काँग्रेसला थेट नाकारलं, भाजपच्या हाती पुन्हा सत्तेच्या चाव्या

त्यांच्या याच विधानानंतर मध्य प्रदेशमध्ये आता पुन्हा एकदा अशी चर्चा सुरू झाली आहे की, ज्योतिरादित्य शिंदे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा मध्य प्रदेशच्या विजयानंतर ज्योतिरादित्य शिंदे नेमकं काय म्हणाले:

गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचं मार्गदर्शन आणि मध्यप्रदेशमध्ये भाजपचा एक-एक कार्यकर्ता, शिवराजसिंह यांचं नेतृत्व आणि त्यांच्या निती याचंच फळ आहे की, आज मध्यप्रदेशमधील भाजप उमेदवार हे असीम बहुमताने.. मी विचार केला होता त्यापेक्षाही अधिक पटीने आज उमेदवार निवडून येत आहेत.

दिग्विजय सिंह यांनी दिलेल्या प्रत्येक वाईट आशीर्वाद मी स्वीकार करतो आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो.. आणि मी कोणाबाबतही मनात वाईट हेतू ठेवत नाही. काँग्रेसचा विचार केल्यास ते काल लाडू खरेदी करत होते, पोस्टर छापले जात होते. आम्ही गप्पपणे आमचं काम करत होतो. पण आम्हाला विश्वास होता की, आम्हाला जनतेचा आशीर्वाद आहे. जनतेने आपला निर्णय दिला आहे. मध्यप्रदेशच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.

मुख्यमंत्री पदासाठी विधीमंडळ गटाचा जो नेता निवडला जाईल त्यासाठी बैठक बोलावली जाईल. याबाबत शिवराजसिंह चौहान आणि आमचे प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील. मी भाजपचा सामान्य कार्यकर्ता आहे. जे ते लोकं ठरवतील त्यानुसार आम्ही काम करू.

राज्यात मी भूमिका सदैव राज्यात जनसेवकाची राहिली आहे. 2002 पासून.. जेव्हापासून मी जनसेवकाचं व्रत अंगिकारलं आहे. जरूर माझ्या आशा-आकांक्षा आहेत. पण माझ्या आशा-आकांक्षा या विकासाची आणि प्रगतीची आहे. त्यासाठी पूर्णपणे मी प्रयत्न करत आहे.

आजच्या या यशाचं श्रेय हे लाडली बहिनाचा आहे. लाडली बहिना हे पूर्णपणे गेमचेंजर ठरलं आहे. त्याचं पूर्ण श्रेय हे शिवराजसिंह चौहान यांनाच जातं. असं ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले.

हे ही वाचा>> Telangana Election Result : ”BRS चे आमदार काँग्रेसच्या संपर्कात”, के.सी. राव यांचं वाढलं टेन्शन

मात्र, आता भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे मध्य प्रदेशची धुरा कोणाच्या हातात सोपावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे अत्यंत अनुभवी आणि संयमी असे समजले जाणारे शिवराजसिंह चौहान यांच्यासारखं नेतृत्व तर दुसरीकडे महत्त्वाकांक्षी असे ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात आता मुख्यमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळू शकते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT