APMC Election Result : बाजार समिती निवडणुकीत कुणी कुणाचा पाडला ‘भाव’?

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra 147 apmc election result live updates bjp vs mva
maharashtra 147 apmc election result live updates bjp vs mva
social share
google news

राज्यभरात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळत आहे. काही बाजार समितींच्या निवडणुका शुक्रवारी पार पडल्या होत्या. त्यांचा निकाल शनिवारी (29 एप्रिल) जाहीर झाला. तर काही बाजार समितींच्या निवडणुका आज (30 एप्रिल) रोजी पार पडल्या. या निवडणुकांचे निकाल आजच जाहीर होत आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितींवर सत्ता मिळविणं हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं बनलं आहे. त्यामुळेच आता या सगळ्यात राजकीय पक्ष देखील आपलं लक्ष घालत आहे. ज्यामुळे या निवडणुकांना देखील अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.

ADVERTISEMENT

जाणून घ्या बाजार समितींच्या निवडणुकीचे नेमके निकाल

जळगाव जिल्हातील यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप शिंदे गटाला घवघवीत यश

15 जागांवर भाजपा-शिवसेनेचा झेंडा

महाविकास आघाडीला अवघ्या 3 जागा

हे वाचलं का?

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का

भाजप नेते गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसेंना मोठं यश

ADVERTISEMENT

जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती मतमोजणी

जवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाचा सुपडा साफ. राष्ट्रवादी, ठाकरे गटाने 18 पैकी 16 जागांवर विजय मिळवून एक हाती सत्ता मिळवली. तर भाजपाला केवळ 2 जागा मिळाल्या आहेत.

ADVERTISEMENT

कोल्हापूर : मतदान पेटीत पैशाचं पाकीट पाकिटात आढळल्या पाचशेच्या दोन नोटा अन् सल्ला देणाऱ्या चिठ्ठ्या

आजकाल निवडणुकीत मतासाठी पैसे देण्याचा प्रकार वाढत आहे. मात्र हे दिलेले पैसे एका उमेदवाराने चक्क मतपेटीतच टाकले. सोबत मतदार राजाने जिल्ह्यातील नेत्यांना सल्ला देणाऱ्या 51 चिठ्ठ्या टाकून आपली मत व्यक्त केली.

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकाल…

18 जागा साठी 51 उमेदवार रिंगणात होते…

यात जनसुराज्य, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तसंच शिंदे- ठाकरे गटाच्या आघाडीची सत्ता आली आहे. 18 पैकी 16 जागा जिंकत राखलं वर्चस्व,

भाजप प्रणित विरोधी परिवर्तन आघाडी 1 जागेवर विजयी

अपक्ष 1

धरणगाव कृषिउत्पन्न बाजार समिती निवडणूक निकाल :

जळगाव जिल्हाची महत्त्वाची लढत असलेली धरणगाव कृषिउत्पन्न बाजार समितीत भाजपा शिंदे गटाला – 13 जागा तर महाविकास आघाडीला – 5 जागा मिळाल्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी होमपिच वर बाजी मारली.

नांदेडमध्ये बाजार समित्यांवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे वर्चस्व, भाजप-शिवसेना युतीला मोठा धक्का

नांदेड जिल्ह्यात बाजारसमिती निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. नांदेड बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वच्या सर्व 18 जागांवर विजय मिळवत भाजपाचा धुव्वा उडवला. काल झालेल्या भोकर बाजार समितीत एकूण 18 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवत भाजपाला धोबीपछाड दिला होता. यामुळे जिल्ह्यातील भोकर आणि नांदेड बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा दिसणार आहे..

बाजार समिती निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी खासदार प्रताप पाटिल चिखलीकर यांनी मोठी रणनीती आखली होती. मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सूक्ष्म नियीजनामुळे भाजपाला पराभवाचा समाना करावा लागल्याचं चित्र आहे. तसेच बाजार समितीत मिळालेला विजय म्हणजे आगामी निवडणुकांमधील विजयाची नांदी असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. या विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निकाल :

12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी 6 ठिकाणी महाविकास आघाडी तर भाजप-शिवसेनेचा 6 जागांवर झेंडा :

जळगाव जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मातब्बर नेते एकनाथ खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील या सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यातच जळगाव बाजार समितीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला. तर भुसावळ येथे भाजप-शिवसेनेने बाजी मारत एकनाथ खडसे यांना मोठा धक्का दिला. भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी जामनेरमध्ये 18 पैकी 18 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. जिल्हातील बोदवड मध्ये एकनाथ खडसे यांनी बाजी मारली. तर धरणगाव बाजार समितीत मंत्री गुलाबराव यांनी बाजी मारली. एकूण जिल्हाची परिस्तिथी पाहिली तर मतदारांनी निम्मे निम्मे कौल दिलेला आहे.

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :

2 उमेदवारांना समसमान मतं 277.  निवडणूक अधिकाऱ्यांनी चिठ्ठीचा वापर करून निर्णय दिला. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी गट वैभव सावर्डेकर आणि कुमार अवजे यांना समान मते मिळाली त्यामुळे चिठ्ठी काढली. त्यामध्ये कुमार अहुजा विजयी ठरले.

वडापावच्या गाड्यावरील मजूर बनला थेट बाजार समितीचा संचालक :

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संजय लाखे हा सर्वसामान्य कोल्हाटी समाजातील युवक निवडून आला आहे. इस्लामपूर शहरातील एका वडा पावच्या गाड्यावर तो मजुरी करतो. मजुरी करणारा संजय नेहमी सामाजिक कार्यात सहभागी असतो. तसेच त्याचे आणि हमाल संघटनांचे संबंध चांगले असल्यामुळे या निवडणुकीत सर्व पॅनेलच्या वतीने शिवसेनेकडे हमाल गटाची जबाबदारी लाखेकडे देण्यात आली होती. ती जबाबदारी पेलत हमाल गटाचे चांगल्या पद्धतीने नियोजन करत संजय लाखे विजयी झाला आहे

नागपूरमध्ये कॉंग्रेसचा झेंडा :

नागपूर जिल्ह्यातील मौदा कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक साठी आज मतदान झाले.18 पैकी 16 जागांवर आमदार सुनील केदार यांच्या नेतृत्वात पॅनल निवडून आले आहे. भाजप समर्थित 1 सदस्य निवडून आला आहे आणि अन्य 1 जण निवडून आला आहे..

नागपूर जिल्ह्यातील 7 पैकी 5 बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्यापैकी रामटेक वगळता कुही- मांढळ, पारशिवनी, मौदा आणि सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस प्रणित पॅनलचा विजय झालेला आहे. उमरेड आणि भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती साठी 13 मे रोजी मतदान होणार असून 14 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील बाजार समित्या या आमदार आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या नेतृत्वात लढवल्या गेल्या होत्या.

आमदार संतोष बांगर यांच्या बाल किल्ल्यात महाविकास आघाडी आघाडीवर

कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या बालेकिल्ल्यातील कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचा विजय.
17 पैकी 12 जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT