BJP 1st Candidate Mumbai List : राम कदम, आशिष शेलार...पहिल्या यादीत मुंबईतून कुणाला मिळाली संधी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra assembly election 2024 bjp 99 candidate  first list announce mumbai 14 seat candidate declare mahayuti devendra fadnavis
BJP 1st Candidate List
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

point

मुंबईतील 14 जांगावर उमेदवार जाहीर

point

मुंबईतून कुणाला दिली संधी?

Maharashtra Assembly Election 2024 BJP 1st Candidates List: मुंबई:  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत मुंबईतील 14 जांगावर उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या मिहिर कोटेचा यांना मुलुंडमधून तर राम कदम यांना घाटकोपर पश्चिममधून उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबईतले ते 14 उमेदवार कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (maharashtra assembly election 2024 bjp 99 candidate  first list announce mumbai 14 seat candidate declare mahayuti devendra fadnavis)

भाजपकडून आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम आणि त्यांचे बंधु विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या मिहिर कोटेचा यांना मुलुंडमधून रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर राम कदम यांना घाटकोपर पश्चिममधून उमेदवारी जाहीर केली आहे. तर तमिल सेल्वन यांना धारावीतून उमेदवारी दिली आहे. या दोघांचे खराब कामगिरीमुळे तिकीट कापले जाईल, अशी चर्चा होती. मात्र काशी आणि अयोध्या यात्रेमुळे त्यांचा जनसंपर्क वाढला होता. त्यामुळे त्यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. 

हे ही वाचा : BJP Marathwada Candidate : संतोष दानवे, बबनराव लोणीकर ते राणाजगजितसिंह... मराठवाड्यात भाजपकडून कुणाकुणाला संधी?'

 

मुंबईतील 14 उमेदवारांची यादी 

58.    मुलुंड - मिहिर कोटेचा
59.    कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
60.    चारकोप - योगेश सागर
61.    मालाड पश्चिम - विनोद शेलार
62.    गोरेगाव - विद्या ठाकुर
63.    अंधेरी पश्चिम - अमीत साटम 
64.    विले पार्ले - पराग अलवणी 
65.    घाटकोपर पश्चिम - राम कदम 
66.    वांद्रे पश्चिम - आशिष शेलार 
67.    सायन कोळीवाडा - कॅप्टन आर. तमिल सेल्वन
68.    वडाळा - कालिदास कोळंबकर
69.    मलबार हिल - मंगल प्रभात लोढा 
70.    कुलाबा - राहुल नार्वेकर

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भाजपने कांदिवली पुर्वेतून अतुल भातखळकर यांना उमेदवारी दिली आहे. चारकोपमधून योगेश सागर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विद्या ठाकूर यांना गोरेगावमधून उमेदवारी दिली आहे. अंधेरी पश्चिमेमधून अमीत साटम आणि पराग अलवणी यांना विले पार्लेतून तिकीट देण्यात आलं आहे. सायन कोळीवाडामधून कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांना उमेदवारी दिली आहे.वडाळ्यातून कालिदास कोळंबकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. कुलाब्यातून राहुल नार्वेकर आणि मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा यांना तिकीट देण्यात आलं आहे. 

हे ही वाचा : BJP Candidate List : 89 विद्यमान आमदारांना संधी, कुणाकुणाला डच्चू? भाजपच्या यादीचं विश्लेषण 10 मुद्द्यात

दरम्यान भाजपच्या या यादीनंतर आता आज रात्री शिंदेंच्या नेत्यांची यादी समोर येण्याची शक्यता आहे.तसेच आता भाजपच्या यादीनंतर महाविकास आघाडी कधी यादी जाहीर करते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT