BJP MLAs Denied Tickets: लाडकी बहीण योजना मतांचा जुगाड म्हणणाऱ्या टेकचंद सावरकरांचं तिकीट कापलं! भाजपनं कुणाला दिली उमेदवारी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

bjp denied  tickets tekchand sawarkar
bjp denied tickets tekchand sawarkar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी केली जाहीर

point

टेकचंद सावरकरांचं तिकीट कापून कामठी मतदारसंघात कुणाला दिली उमेदवारी?

point

भाजपने एकूण 99 उमेदवारांची नावं केली जाहीर

Headline: BJP MLAs Denied Tickets: मोठी बातमी, भाजपने 'या' आमदारांचं तिकिटं कापलं, कामठीत कोणाला दिली उमेदवारी?
Excerpt: Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी भाजपने आज पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पण यामध्ये भाजपने अनेक दिग्गजांची तिकिटं कापली आहेत. लाडकी बहीण योजना हा मतांसाठी केलेला जुगाड म्हणणारे टेकचंद सावरकर यांचं तिकीट कापलं आहे. भाजपक़डून चंद्रशेखर बावनकुळे कामठी मधून निवडणूक लढणार आहेत. 

राज्यात पहिल्यांदाच भाजप दोन मोठ्या मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिगंणात उतरली आहे. अशावेळी महायुतीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळणार यावरून मागील काही दिवस तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर आज भाजपच्या पहिल्या यादीनंतर त्याबाबतचा सस्पेन्स हा काहीसा कमी झाला आहे. 

2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने किती जागा लढवलेल्या? 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. तर  शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. त्याआधी म्हणजे 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. त्यांनी या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> BJP Candidate List : 89 विद्यमान आमदारांना संधी, कुणाकुणाला डच्चू? भाजपच्या यादीचं10 मुद्द्यांमध्ये विश्लेषण

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल आले त्यानंतर सगळी गणितंच बदलून गेली. कारण त्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. त्यावेळी भाजपे 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 आणि काँग्रेसने 44 जागांवर विजय मिळवला होता.मात्र, निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. 

दरम्यान, 2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून ठाकरेंचं सरकार पाडलं. यानंतर त्यांनी भाजपच्या साथीने राज्यात महायुतीचं सरकार बनवलं. तर 2023 साली अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आणि ते थेट महायुती सरकारमध्ये सामील झाले. यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहेत. ज्यामध्ये दोन्हीकडे 3-3 पक्षांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> BJP 1st Candidate Mumbai List : राम कदम, आशिष शेलार...पहिल्या यादीत मुंबईतून कुणाला मिळाली संधी?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT