NCP : एक मिनिट... यादी नाही थेट AB फॉर्मच दिले, अजितदादांचा पॅटर्नच वेगळा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra assembly election 2024 ncp ajit pawar give these candidate ab form vidhan sabha election mahayuti
'या' नेत्यांना AB फॉर्मचे वाटप
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांनी थेट एबी फॉर्मच वाटप केले

point

'या' नेत्यांना दिले एबी फॉर्म

point

उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार?

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र भाजपसोबत महायुतीत असलेल्या शिंदे-पवारांनी अद्याप उमेदवार जाहीर केला नाही आहे. त्यातल्या त्यात अजित पवारांनी आपला वेगळाच पॅटर्न राबवला आहे. अजित पवारांनी यादी जाहीर करण्याच्या भानगडीत न पडता थेट एबी फॉर्मच वाटप केलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी त्यांच्या नेमक्या कोणत्या उमेदवाराला एबी फॉर्म वाटप केले आहेत. हे जाणून घेऊयात. (maharashtra assembly election 2024 ncp ajit pawar give these candidate ab form vidhan sabha election mahayuti) 

विधानसभेसाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास सूरूवात झाली आहे. त्यामुळे अजित पवारांनी सोमवारपासून त्यांच्या देवगिरी बंगल्यावरून एबी फॉर्म वाटपाला सूरूवात केली होती. काल तब्बल देवगिरी बंगल्यावर दाखल झालेल्या 21 उमेदवारांना त्यांनी एबी फॉर्म वाटप केले आहेत. या उमेदवारांची नावे देखील समोर आली आहे. त्यामुळे नेत्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. आता हे उमेदवार कोण आहेत? हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : Rupali Thombare: "बाई काय हा प्रकार...तोच तो डर्टी पिक्चर", रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर?

'या' नेत्यांना AB फॉर्मचे वाटप 

 संजय बनसोडे - उदगीर लातूर 
चेतन तुपे - हडपसर पुणे 
सुनील टिंगरे - वडगाव शेरी पुणे 
दिलीप वळसे पाटील - आंबेगाव पुणे 
दौलत दरोडा - शहापूर पालघर 
राजेश पाटील - चंदगड कोल्हापूर 
दत्तात्रय भरणे - इंदापूर पुणे 
आशुतोष काळे- कोपरगाव अहमदनगर 
हिरामण खोसकर- इंगतपुरी त्रंबकेश्वर नाशिक 
नरहरी झिरवळ- दिंडोरी नाशिक 
छगन भुजबळ- येवला नाशिक 
भरत गावित - एबी फॅार्म दिला नवापूर नंदुरबार 
बाबासाहेब पाटील- अहमदपूर चाकूर -लातूर 
नितीन पवार - कलवण - नाशिक 
इंद्रनील नाईक- पुसद - यवतमाळ 
अतुल बेनके:- जुन्नर पुणे 
बाळासाहेब आजबे..- आष्टी पाटोदा - बीड 
शेखर निकम - चिपळूण संगमेश्वर 
धनंजय मुंडे - परळी बीड
राजू नवघरे - बसमत परभणी
किरण लहामटे - अकोले ( अहिल्यानगर)

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अण्णा बनसोडेंना अद्याप 'एबी' फॉर्म दिलाच नाही

पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंना तिकीट दिलं तर आम्ही प्रचार करणार नाही. असा ठराव महायुतीतील अठरा माजी नगरसेवकांना केलाय. यात अजित पवार गटाचे काळूराम पवार, भाजपचे अण्णा पिल्ले, शिंदे गटाचे जितेंद्र ननावरे आणि आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे या चार इच्छुकांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी महायुतीच्या या गटाने केलीय आहे. अजित दादांना हा विरोध ठाऊक असल्यानेच त्यांनी इतर आमदारांप्रमाणे अण्णा बनसोडेंना अद्याप 'एबी' फॉर्म दिलेला नाही आहे. 

हे ही वाचा : Election 2024: शहाजीबापूंना फोन करणारा हाच', कारमध्ये 5 कोटी.. सुषमा अंधारेंनी उडवली खळबळ

दरम्यान अद्याप महायुतीच्या जागावाटपावरून तोडगा निघाला नाही आहे. त्यामुळे अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल दिल्लीला रवाना झाल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता अजित पवार आता लवकरच उमेदवारी यादी जाही करण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT