Ashok Chavan: 'मी पण पक्षाला बरंच काही दिलंय...', काँग्रेस सोडताच असं का म्हणाले अशोक चव्हाण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

अशोक चव्हाणांचं मोठं विधान
अशोक चव्हाणांचं मोठं विधान
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम

point

अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?

point

चव्हाणांनी काँग्रेस का सोडली?

Ashok Chavan Congress Resignation: मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आमदारकीचा आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मी राजीनामा दिला आहे. पुढे काय करायचे ते एक-दोन दिवसांत ठरवेन. याच वेळी त्यांना असाही प्रश्न विचारण्यात आला की, तुम्हाला काँग्रेसने मुख्यमंत्री पदासह बरंच काही दिलं तरीही तुम्ही काँग्रेस का सोडत आहात. त्यावर चव्हाण असं म्हणाले की, 'हे खरं आहे की, मला पक्षाने बरंच काही दिलं आहे.. पण तेवढंच मी देखील पक्षाला दिलं आहे.' (maharashtra political drama i also given a lot to party why did ashok chavan say this while leaving the congress)  

ADVERTISEMENT

काँग्रेस सोडल्यावर नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण?

मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज भेटून दिला आहे. त्यानंतर मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये होतो तोवर मी प्रामाणिकपणे काम केलं आहे. मला कुठलीही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही. 

'मी आयुष्यभर काँग्रेससाठी काम केले, पण आता मी पर्याय शोधत आहे. चव्हाण म्हणाले की, मी प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधीमंडळ पक्षाचा आणि कार्यकारिणीचा राजीनामा दिला आहे. मी सध्या कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मी कोणत्याही काँग्रेस आमदार किंवा नेत्याशी बोललो नाही. मी पक्षाच्या प्रश्नांवर जाहीर चर्चा करणार नाही. पंतप्रधानांच्या श्वेतपत्रिकेचा आणि माझा राजीनामा याचा काहीही संबंध नाही.'

हे वाचलं का?

'जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी काम केलेलं आहे. यापुढची राजकीय दिशा पुढील एक-दोन दिवसात स्पष्ट करेल. भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही. भाजपमध्ये जाण्याचा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही.'

हे ही वाचा>> देशमुख-शिंदेही देणार धक्का?, बावनकुळेंचं मोठं विधान

'प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे असं काही नाही. मी पहिल्यापासून ते आजपर्यंत काँग्रेसचं काम केलं आहे. मला वाटलं की, अन्य पर्याय पाहिले पाहिजे. हे खरं आहे की, मला पक्षाने बरंच काही दिलं आहे.. पण तेवढंच मी देखील पक्षाला दिलं आहे.' असं चव्हाण यावेळी म्हणाले.  

ADVERTISEMENT

X वर बदलली माहिती...

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना पाठवलेल्या पत्रात अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. यानंतर लगेचच अशोक चव्हाण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर (ट्विटर) आपला बायो बदलला. यापूर्वी त्याच्या बायोमध्ये CWC सदस्य आणि काँग्रेस पक्षाचे नाव होते, जे आता काढून टाकण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

शिवसेना UBT उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्या या चालीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले, 'अशोक चव्हाणांबद्दल मला आश्चर्य वाटते, कालपर्यंत ते जागावाटपात भाग घेत होते आणि अचानक त्यांच्यात काय बदल झाला. मला वाटतं ते राज्यसभेसाठी गेले आहे. प्रत्येकजण स्वतःचाच विचार करत आहे.'

10-12 आमदार जाऊ शकतात सोबत

अशोक चव्हाण यांनी आज (12 फेब्रुवारी) सकाळी 11.24 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. त्यांचा राजीनामा देखील स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण हे भाजपकडून राज्यसभेवर जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. त्यांच्यासोबत 10 ते 12 आमदारही पक्ष बदलू शकतात. महाराष्ट्र काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी आणि मिलिंद देवरा यांनी काही काळापूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली असताना आता ही घडामोड घडली आहे.

अशोक चव्हाण यांच्याबद्दल जाणून घ्या

अशोक चव्हाण हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील रहिवासी आहेत. मात्र त्यांचे पूर्वज नांदेडमध्ये स्थायिक झाले आणि तेव्हापासून त्यांना नांदेडकर म्हटले जाऊ लागले. त्यांना त्यांचा राजकीय वारसा त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्याकडून मिळाला, जे दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शंकरराव चव्हाण यांच्यामुळेच मराठवाड्यात काँग्रेस मजबूत झाली आणि सत्ताविरोधी लाट असतानाही इथून काँग्रेसला कोणीही हलवू शकलं नाही. प्रत्येक अडचणीत पक्षाच्या पाठीशी उभा राहिलेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण महाराष्ट्रातील काँग्रेसचा चेहरा मानला जात होते. अशोक चव्हाण यांनी देखील दोनदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं. पण आदर्श घोटाळ्यात झालेल्या आरोपामुळे त्यांना आपलं मुख्यमंत्री पद गमवावं लागलं होतं.

हे ही वाचा>> Devendra Fadnavis : अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर? फडणवीस म्हणाले, 'मला विश्वास...'

लोकसभ 2014 निवडणुकीत मोदी लाट असूनही त्यांनी काँग्रेसला नांदेडमधून विजय मिळवून दिला होता. पण 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पुन्हा विधानसभेचं तिकिट देण्यात आलं होतं. विधानसभेत विजय मिळविल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये त्याना कॅबिनेट मंत्रिपदही देण्यात आलं होतं.

काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून राजीनामे

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची प्रक्रिया सुरूच आहे. नगरसेवक आणि मुंबई जिल्हाध्यक्ष जगदीश अमीन यांनी आपल्या पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय काँग्रेसचे माजी आमदार आणि नांदेड शहर उपाध्यक्ष अमर राजूरकर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT