Manoj Jarange: सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीनंतर मनोज जरांगे संतापले! म्हणाले, "समाजाच्या बांधवाचा खून केलाय, तुम्ही त्याला..."
Manoj Jarange Patil On Suresh Dhas: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची जवळपास साडेचार तास भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतली मंत्री धनंजय मुंडेंची भेट

धस-मुंडे भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान

मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?
Manoj Jarange Patil On Suresh Dhas: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची जवळपास साडेचार तास भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय. मनोज जरांगे म्हणाले, "हे खूप धक्कादायक आहे. मी माहिती घेणार आहे. गोर-गरिबांच्या लेकरांच्या न्यायासाठी आपण लढलात, म्हणून या कोट्यावधी समाजाने तुमच्यावर खूप मोठा विश्वास दाखवला होता. विश्वास आहे पण..परंतु, राजकारणाच्या आणि सत्तेच्या एवढं आहारी जाऊन समाजाशी दगा-फटका करणं हे योग्य नाही. कारण धस अण्णांकडून हे होईल, हे कदापी अपेक्षा नव्हती. त्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता". पंकजा मुंडे मंत्री झाल्या तर तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार का? तेव्हा ते म्हणाले होते, अजिबात देणार नाही. जे मला पाडायला उठले, त्यांना मी शुभेच्छा देणार नाही. या माणसांनी तर आपल्या समाजाच्या बांधंवाचा खून केलाय, क्रूरपणे हत्या केली, तुम्ही त्याला भेटायला कसे काय गेले?, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला.
धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली होती, असं सुरेश धस म्हणाले. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, ते कशासाठी गेले, का गेले हे मला आता खरंच सांगता येणार नाही. या राज्यानं खूप विश्वास टाकला. गोर गरिबांनी त्यांना आयकॉन मानण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. मी पण सांगितलं होतं, समाजासाठी लढतोय हा माणूस..पोरांनी अजिबात उघडं पडू देऊ नका. अजिबात या माणसाला उघडं पडू द्यायचं नाही. ताकदीनं उभं राहायचं. समाजाने काही कमी केलं नव्हतं. समाजाने खूप बहूमताने निवडून दिलं होतं. तीनशे सव्वा तिनशे पोरं अशी आहेत की त्यांनी धस अण्णाचं कधी तोंडली बघितलं नव्हतं.
हे ही वाचा >> Suresh Dhas : सुरेश धस-धनंजय मुंडे यांची भेट, साडेचार तास चर्चा? बावनकुळे आणि धस काय म्हणाले?
पण यावेळी 73 गाव फिरवायची कामे त्यांनी केलं होतं. संतोष देशमुखांचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील, उन्हात पडलेल्या देशमुखांच्या घरावरील छत्रही जाळून टाकतील. कधीही वाटलं नव्हतं. हे जर खरं असेल, तर हे दुर्देव आहे. वंजारी, ओबीसी समाज वेडिस धरला, खुन-बलात्कार करून मराठेही मारले. त्या व्यक्तींना भेटायला जावंस वाटतंय. गुंडाची टोळी चालवणाऱ्याला ज्यांनी सपासप वार करून लोकांचे मुडदे पाडले, अशा व्यक्तींना भेटायला तुम्ही जाताय, हे महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं दुर्देव आहे, असंही जरांगे म्हणाले.