‘मुंबईची लूट अहमदाबाद, दिल्लीच्या आदेशावरून’, आदित्य ठाकरे प्रचंड चिडले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mla aditya thackeray criticizes chief minister eknath Shinde on the order of Mumbai loot Ahmedabad Delhi
mla aditya thackeray criticizes chief minister eknath Shinde on the order of Mumbai loot Ahmedabad Delhi
social share
google news

Aditya Thackeray : हिवाळी अधिवेशन (Winter Session) वेगवेगळ्या मुद्यांनी गाजले असतानाच आज आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. सध्या ज्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून मुंबईची लूट सुरू आहे, ती अहमदाबाद आणि दिल्लीच्या आदेशावरूनच लूट केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केला आहे. आज पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्ते घोटाळे आणि संसदेतील घुसखोरीवर बोलत त्या युवकांचे मी समर्थन करत नसलो तरी त्यांच्यावर तशी का परिस्थिती निर्माण झाली त्यावर सरकार कधी विचार करणार आहे की नाही असा सवालही त्यांनी केंद्र सरकारला केला आहे.

ADVERTISEMENT

तो घोटाळा बाहेर काढला

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरू झाले. मात्र हे घोटाळे आम्ही पत्रकार परिषद घेऊन बाहेर काढले आहेत. पहिल्या काही दिवसात पत्रकार परिषद घेऊन आम्ही 400 कोटीचा घोटाळा बाहेर काढला. त्यामुळे त्या रस्त्यांच्या कामाला खीळ बसली, मात्र त्यानंतरही आमच्या ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन घोटाळा झाल्याचे सांगितल्यामुळे 6 हजार 182 हजार कोटीचा घोटाळा वाचवला आहे. त्यामुळे असे कितीतरी घोटाळे या घटनाबाह्य सरकारने केले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हे ही वाचा >> तोंडातच सुतळी बॉम्ब फोडून केली आत्महत्या, तरुणाने का उचललं टोकाचं पाऊल?

तुम्ही तुमची कामं दाखवा

आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या कामावर बोट ठेवत त्यांनी सांगितले की, ज्या 50 रस्त्यांच्या डागडूजीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या, त्या रस्त्यांचे काम कित्येक दिवस झाले तरी पूर्ण झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी 2023 मधील कोणते रस्ते पूर्ण झाले आहेत ते त्यांनी दाखवण्याचे धाडस दाखवावे किंवा मी केलेले आरोप त्यांनी खोडून दाखवावे असं जाहीर आव्हानही आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

हे वाचलं का?

केंद्र जाब कधी विचारणार?

संसदेत तरुणांनी केलेल्या घुसखोरीवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्या खासदारांच्या पास ज्या तरुणांनी संसदेत प्रवेश केला होता. त्या खासदारांना हे सरकार कधी जाब विचारणार आहे, असा सवाल करून त्यांनी केंद्रालाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा >> Manoj Jarange : ‘तुम्ही विचार करायचा होता ना?’, जरांगे पाटलांनी पकडलं कात्रीत

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT