Vidhan Parishad Election : "क्रॉस व्होटिंगमध्ये माझे नाव आल्याचे पाहिले अन्...", आमदार चौधरींनी सोडलं मौन

मुंबई तक

ADVERTISEMENT

आमदार शिरीष चौधरी.
काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी क्रॉस व्होटिंगच्या मुद्द्यावर काय भूमिका मांडली?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ७ ते ८ आमदारांनी केले क्रॉस व्होटिंग

point

आमदार शिरीष चौधरी यांच्या नावांचीही चर्चा

point

क्रॉस व्होटिंगच्या आरोपांवर आमदार चौधरी यांनी भूमिका स्पष्ट केली

Shirish Chaudhari Vidhan Parishad Election : (मनीष जोग, जळगाव) विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने महाविकास आघाडीला झटका बसला. काँग्रेसच्या ७ ते ८ आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील अहवाल काँग्रेसने दिल्लीला पाठवला आहे. आमदार शिरीष चौधरी यांनीही क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे. त्यावर त्यांनी अखेर मौन सोडले. (Congress MLA Shirish Choudhary has Expressed Disappointment on the allegation of cross voting in the Legislative Council elections 2024) 

ADVERTISEMENT

क्रॉस व्होटिंग केल्याच्या मुद्द्यावर शिरीष चौधरीची भूमिका काय?

आमदार चौधरी म्हणाले, "विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्यांनी क्रॉस व्होटिंग केले, त्यामध्ये माझे नाव आल्याचे मी पाहिले. ते पाहिल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटलं आणि दुःखही झाले. दुःख एवढ्यासाठी झाले की, अशा प्रकारचे नतद्रष्ट राजकारण मी आजपर्यंत कधी केले नाही, यापुढेही करणार नाही. जे पटलं नाही, ते एकवेळ स्पष्ट तोंडावर सांगू की आम्हाला हे पटत नाही. आम्ही हे करणार नाही, नेते जरी असले तरी."

क्रॉस व्होटिंग करण्याची भूमिका कधीही घेणार नाही -आमदार शिरीष चौधरी

शिरीष चौधरी पुढे म्हणाले की, "लबाडी करणे, क्रॉस व्होटिंग करणे ही भूमिका मी आयुष्यात कधी घेऊ शकणार नाही. घेणार नाही. आमच्या परिवाराची जी पार्श्वभूमी आहे. आम्ही सातत्याने काँग्रेसबरोबर निष्ठेने काम केले आहे. ही निष्ठा बाळगून आम्ही आजपर्यंत वाटचाल केलेली असताना अशा प्रकारे अंदाजा आधारे माझे नाव पुढे आलेले आहे."

हे वाचलं का?

हेही वाचा >> 'मविआ'च्या बैठकीत उडाले खटके! पवारांचे फोन, ठाकरेंचा 'नो रिस्पॉन्स'

"मी क्रॉस व्होटिंग केलेले नाही. पक्षाचे नेतृत्वाने या संबंधिची माहिती घेतलेली आहे. कुणी क्रॉस व्होटिंग केले, याबद्दल खात्री करून घेतलेली आहे. ते लवकरात लवकर त्यांनी जाहीर करावं, अशी विनंती मी त्यांना केलेली आहे. त्यांनी मला स्पष्ट केले आहे की, तुम्ही याच्यात नाही आहात", अशी माहिती चौधरी यांनी दिली.

 

ADVERTISEMENT

आमदार चौधरी म्हणाले, "काँग्रेस नेतृत्वाने सांगण्याची वाट बघतोय"

"मी याबद्दल सांगणे आणि पक्षाच्या नेतृत्वाने सांगणे यात फरक आहे. त्यामुळे मी त्यांच्या घोषणेची वाट पाहतोय. मी यामुळे निराश किंवा दुःखी नाही. पण, ज्या श्रद्धेने, निष्ठेने काम करतोय, त्याला धक्का लावण्याचे काम अशा प्रकारच्या बातम्या करतात", अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> आव्हाड भुजबळांना म्हणाले, "तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता तर..." 

"अशोक चव्हाण हे माझे मित्र आहेत आणि कदाचित त्यांच्या सांगण्यामुळे मी गेलो असेल... पक्षापलिकडे राजकारणात मैत्री सगळ्यांची असते. पण, मी कुणाचा उपकृत नाहीये. त्यामुळे त्यांनी सांगावं अशा प्रकारे मी करावं असे कोणतेही उपकार मी त्यांच्याकडून घेतला नाही", अशी भूमिका आमदार शिरीष चौधरी यांनी मांडली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT