MNS : राज ठाकरेंच्या लेकाविरोधात शिंदेंचा शिलेदार, अमित ठाकरेंविरोधात 'हा' शिवसेना नेता मैदानात

मुंबई तक

ADVERTISEMENT

 राज ठाकरेंच्या लेकाविरोधात शिंदेंचा शिलेदार
राज ठाकरेंच्या लेकाविरोधात शिंदेंचा शिलेदार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अमित ठाकरे विधानसभेच्या मैदानात

point

शिंदेंच्या उमेदवारांची यादीही जाहीर

point

अमित ठाकरेंविरोधात कोण लढणार?

राज ठाकरेंच्या लेकाविरोधात शिंदेंचा शिलेदार, पाहा अमित ठाकरेंविरोधात हा शिवसेना नेता मैदानात 

Maharashtra Assembly Election 2024 MNS  Candidates List: मुंबई: विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024)  महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष यंदा पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचं दिसतंय. नुकतीच मनसेने आता (MNS)आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतून मनसेने 45 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, या यादीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांनी आपले पुत्र अमित ठाकरेंना माहीम मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलंय. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांमध्ये राज ठाकरे आणि शिंदेंमधील भेटीगाठीनंतरही दोघांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिल्यानं सध्या चर्चा सुरूय.(MNS Amit Thackeray to contest vidhan sabha election from mahim against sada sarvankar)

हे ही वाचा >>Raj Thackeray MNS Candidate List: अमित ठाकरेंना तिकीट जाहीर, राज ठाकरेंकडून मनसेची यादी जाहीर

 

शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वैरासोबतच एकनाथ शिंदेंधील भेटीगाठी वाढत गेल्या. मागच्या अडीच वर्षांमध्ये एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात गणेशोत्सव, दिवाळी आणि इतर गोष्टींच्या निमित्तांनी 4 पेक्षा जास्तवेळी भेटी झाल्या. तसंच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशीही भेटीगाठी झाल्या होत्या. त्यामुळे महायुतीचा मनसेला पाठिंबा असेल अशी चर्चा होती. मात्र राज ठाकरे यांनी अखेर वेगळं लढण्याची भूमिका घेतली. त्यानंतर राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे हे स्वत: माहीम मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात महायुती उमेदवार देणार की नाही यावर सर्वांचं लक्ष होतं. मनसेने काल दुपारी आपली दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये मनसेने अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर केली. आणि त्यानंतरच काल रात्री शिंदेंनी देखील आपली यादी जाहीर करत माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर या आपल्या विद्यमान आमदाराला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अखेर शिंदेंचा उमेदवार राज ठाकरेंच्या लेकाविरोधात दंड थोपटून मैदानात उतरल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरूय. 
 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Raj Thackeray : राज काकांचा आता पुतण्याविरोधात उमेदवार, आदित्य ठाकरेंना 'हा' मनसैनिक भिडणार!

 

 

दरम्यान, राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आपली माणसं सत्तेत बसवायची आहेत असं विधान केलं होतं. त्यामुळे निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर राज ठाकरे महायुतीसोबत असतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता दोघांनीही एकमेकांविरोधात उमेदवार उमेदवार दिल्यानं या चर्चांना सध्यातरी पूर्णविराम लागलाय. तसंत माहीम मतदारसंघात राज ठाकरेंचा लेक जिंकणार की, शिंदेंचा शिलेदार बाजी मारणार यावर महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT