Shiv Sena UBT: शिवसेना ठाकरे गटातच मुंबईच्या जागांवरुन राडा, 'मातोश्री'वर वेगवान घडामोडी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shivsena Thackeray Group Mumbai Candidates
Uddhav Thackeray latest News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईच्या जागावाटपावरून शिवसेना ठाकरे गटात खलबतं

point

'या' नेत्यांनी मातोश्रीवर लावली हजेरी

point

मातोश्रीवर राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांमध्ये जागावाटपावरून मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडे नेते तिकीटासाठी आपापल्या पक्षांच्या कार्यालयात भाऊगर्दी करत आहेत. महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील जागावाटपाचा मुद्दा कळीचा बनला आहे. कारण दोन्ही पक्षांमध्ये जागांबाबत मदभेत असल्याने राजकीय संघर्ष होत आहे. त्यामुळे मातोश्रीवर वेगवान घडामोडी घडत असल्याचं समोर आलं आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपावरून बिघाडी झाल्याचं बोललं जात आहे. मविआमध्ये जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने ठाकरे गटात मुंबईच्या जागांवरून रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे मातोश्रीवर नेत्यांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. अजय चौधरी, प्रकाश फातर्पेकर मातोश्रीवर पोहोचले आहेत. संजना घाडी, मनोज जामसुदकरही मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

हे ही वाचा >> Maharashtra Voters Survey : जनतेची पसंती उद्धव ठाकरेंनाच? शिंदेंना बसणार धक्का? : सर्व्हे

मुंबईच्या जागांवर अनेक नेते इच्छुक असल्याने ठाकरे गटात जागांचा तिढा कधी सुटणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चेंबूर, शिवडी, भायखळा, कुर्ला जागांबाबत तिढा आहे. मागाठाणे, घाटकोपर पश्चिमच्या जागेबाबतही निर्णय घेण्यात आलेला नाही. शिवडीसाठी अजय चौधरी, सुधीर साळवी इच्छूक आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबईच्या जागांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे कोणते उमेदवार इच्छूक?

चेंबूरमध्ये प्रकाश फातर्पेकर, अनिल पाटणकर, घाटकोपर (प) साठी सुरेश पाटील, संजय भालेराव, तर मागाठाणेसाठी संजना घाडी, उदेश पाटेकर इच्छुक आहेत. मातोश्रीवर शिवडी विधानसभेवरून खलबतं सुरु आहेत. अजय चौधरी आणि सुधीर साळवी दोघांनाही मातोश्रीवर बोलावून घेतलं होतं. परंतु, दोघेही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. ठाकरेंची शिवडी विधानसभेसाठी वेट ॲन्ड वॅाचची भूमिका असणार आहे.

हे ही वाचा >> Bollywood Actress: भारताची सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण? 4600 कोटींचं नेटवर्थ, नाव वाचून थक्कच व्हाल

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. भाजपने काल रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटातही खळबळ उडाली असून मविआ आज त्यांच्या घटक पक्षातील उमेदवारांची यादी घोषित करणार असल्याचं समजते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT