Ladki Bahin Yojana : ''लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही'', CM शिंदेंनी दिला शब्द

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana eknath shinde big statement mukhyamantri ladki bahin yojana scheme jalgaon shiv sena melava
आम्ही नोव्हेंबरचे पैसे आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणी 20 तारखेला काम करतील

point

विरोधकांच्या बुडाला फटाके फुटायला लागलेत

point

तुम्ही ताकद दिली तर दोन हजार,तीन हजार रूपये करू

Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : मनीष जोग, जळगाव :  महायुतीच सरकार आल्यावर लाडकी बहीण योजना बंद पडेल असा प्रचार सध्या विरोधकांकडून सूरू आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ''कोणी मायका लाल आला तरी  लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे. तसेच आम्ही नोव्हेंबरचे पैसे आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. (ladki bahin yojana eknath shinde big statement mukhyamantri ladki bahin yojana scheme jalgaon shiv sena melava)  

जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यातूव बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लाडक्या बहिणी 20 तारखेला काम करतील. दिवाळी आली आहे. विरोधकांच्या बुडाला फटाके फुटायला लागलेत,असा टोला शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे. 

हे ही वाचा : Maharashtra Assembly Election : अजित पवारांविरूद्ध उमेदवार ठरला, वंचितची पाचवी यादी जाहीर

आपण देणारा मुख्यमंत्री आहे. लाडकी बहीण योजना सुरू करायची म्हटलं तर अनेकांना हा चुनावी जुमला वाटला, मात्र महिलांच्या खात्यावर पैसे आले, आपण एकदा ठरवले तर आपण स्वतःचे पणं ऐकत नाही, महिलांच्या नावावर पैसे आल्याने विरोधक अफवा पसरवू लागले आहेत. बुरी नजर वाले तेरा मुह काला, पैसे परत जातील म्हणून सांगू लागले, आम्ही मात्र नोव्हेंबरचे पैसे ही अगोदरच दिले आहेत. आता समोरच्याचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. काही जणांनी याला कोर्टात नेले, मात्र कोर्टाने त्यांच्या थोबाडीत दिली, आपण आचारसंहिता अगोदर योजना आणली, ही योजना कायम राहणार आहे, त्याचं नियोजन केले आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मी गरीबी पाहिली आहे, म्हणून मी ठरवले आहे देण्याची वेळ आली तर आपण द्यायचं. कोणी मायका लाल आला तरीही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, तुम्ही ताकद दिली तर दोन हजार,तीन हजार रूपये देण्यात येतील. देण्याची दानत महायुती सरकारमध्ये आहे. मला बहिणी लखपती झालेल्या पहायचं आहे,असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेविरोधात बँक कर्मचाऱ्यांचं 'या' तारखेला आंदोलन! नेमकं कारण काय?

चंद्रकांत पाटलाना 50 हजाराचा लीड द्या आणि समोरच्याच डिपॉझिट जप्त करा.  पुन्हा राज्यात महायुतीचा सरकार महाराष्ट्रात आल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी व्यक्त केला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT