Maharashtra Voters Survey : जनतेची पसंती उद्धव ठाकरेंनाच? शिंदेंना बसणार धक्का? : सर्व्हे
Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात सुरू असलेल्या या सर्व घडामोडींदरम्यानच राज्यातील जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजून आहे हे जाणून घेण्यासाठी सर्व्हे करण्यात आला. 21 सप्टेंबर 2024 ते 06 ऑक्टोबर 2024 दरम्यान 'लोकनिती : सेंटर आणि स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज् आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट'ने केलेल्या या सर्व्हेमध्ये लोकांची मतं जाणून घेण्यात आली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण?
विधानसभेला कोणत्या मुद्द्यांवर मतदान?
बेरोजगारी, दरवाढीला जबाबदार कोण?
Maharashtra Assembly Elections Survey : काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला 2019 च्या लोकसभेच्या तुलनेत मोठा फटका बसला. भाजपच्या या कमी झालेल्या जागांचं गणित समजून घेताना महाराष्ट्र फार महत्वाचा ठरतो. त्यामुळेच आता राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडेही देशाचं लक्ष लागून आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सगळेच पक्ष दंड थोपटून मैदानात उतरलेत. (Maharashtra Assembly Elections Opinion Poll Survey for popularity of Eknath shinde and uddhav thackeray )
ADVERTISEMENT
राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या महायुतीचं सरकार आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील या सरकारने आपल्या कामाची छाप सोडण्यासाठी मागच्या काही दिवसांमध्ये अनेक योजनांची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सहभागी असलेल्या महाविकास आघाडीकडून पक्षफोडीचे आरोप करत भाजपला निशाण्यावर धरलं जातंय.
हे ही वाचा >>Sanjay Raut : सांगलीवर बोलत असाल तर आम्हीही कोल्हापूर, रामटेकचं... राऊतांचा थेट काँग्रेसला इशारा?
राज्यात सुरू असलेल्या या सर्व घडामोडींदरम्यानच राज्यातील जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजून आहे, जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला सरस मुख्यमंत्री कोण अशा अनेक प्रश्नांवर आधारित सर्व्हे करण्यात आला. 21 सप्टेंबर 2024 ते 06 ऑक्टोबर 2024 दरम्यान 'लोकनिती : सेंटर आणि स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज् आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट'ने केलेल्या या सर्व्हेमध्ये महायुती सरकारचं काम आणि यापूर्वी असलेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारने केलेल्या कामाबद्दल लोकांची मतं जाणून घेण्यात आली.
हे वाचलं का?
वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये जनतेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच राज्यातील सामाजिक सलोख्य जपण्यासाठी आणि विकासासाठी उत्तम होतं असं वाटतंय. तर दुसरीकडे पाणी, वीज, रस्ते या सुविधा पुरवण्यासाठी मात्र शिंदे सरकारने उत्तम कामगिरी केल्याचं म्हटलं आहे.
हे ही वाचा >>BJP Candidate List : भाजपने संधी दिलेल्या 'त्या' 13 लाडक्या बहिणी कोण? यादीत कुणाची नावं?
गेल्या दोन वर्षांचा महायुती सरकारचा कार्यभार पाहता अनेक बाबींमध्ये परिस्थिती ही पूर्वीसारखीच असल्याचं मतदार म्हणत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत जनता सध्याच्या सरकारच्या बाजूने उभी राहील की आणखी कामांची अपेक्षा ठवून दुसऱ्यांना संधी देईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या योजनांमुळे समाधानी असलेल्या लोकांचा टक्का हा सरकारच्या कामाशी असमाधानी असलेल्या लोकांपेक्षा जास्त असल्यांच दिसून येतं.तसंच प्रत्येक चौथ्या मतदारानंतर पाचवा मतदार हा सरकारच्या कामांवर समाधानी आहे. तर त्यापेक्षा काहीप्रमाणात कमी म्हणजेच 18 टक्के मतदार हा सरकारच्या कामाबद्दल पूर्णपणे असमाधानी आहे.
ADVERTISEMENT
बहुतेक मतदारांचं सरकारवर समाधान व्यक्त करण्याचं कारण हे राज्यातील शिंदे सरकार आणि केंद्रातलं मोदी सरकारमार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनाच आहेत. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये त्याचा कसा परिणाम होतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, यामध्ये हे सुद्धा महत्वाचं आहे की, योजनेचे सगळेच लाभार्थी हे सरकारच्या बाजूने नाहीत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT