MOTN : मोदींसोबत कोणती राज्य! लोकसभेला 'इंडिया आघाडी' किती जागा?
लोकसभा २०२४ निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए आघाडी हॅटट्रिक करणार की इंडिया आघाडी जायंट किलर ठरणार?
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विरोधकांच्या इंडिया आघाडीची ही पहिलीच निवडणूक
इंडिया टुडे-सी व्होटरच्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेत काय?
देशातील 543 लोकसभा मतदारसंघात सर्व्हे
India Today-C voter Survey : 2024 ची लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची ही पहिलीच निवडणूक आहे. दुसरीकडे भाजपनेही एनडीएच्या माध्यमातून कंबर कसली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागतील, याबद्दल उत्सुकता आहे. इंडिया टुडे-सी व्होटरने केलेल्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेतून देशाचा कौल समोर आला आहे. (Mood of the Nation Opinion Poll 2024 State Wise figures)
ADVERTISEMENT
देशातील 543 लोकसभा मतदारसंघात सर्व्हे करण्यात आला. दीड महिने चाललेल्या या सर्व्हेमध्ये जवळपास दीड लाख लोकांना सहभागी करून घेण्यात आले. 35 हजार लोकांशी बोलून त्यांच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्यात आलं. त्या आधारावरच आजघडीला लोकसभा निवडणूक झाल्यास काय निकाल लागू शकतात, याचा अंदाज मूड ऑफ द नेशनमधून व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या मनात काय, पोलचे आकडे काय?
मूड ऑफ द नेशनचा सर्व्हे भाजप नेतृत्वाखालील महायुतीचे टेन्शन वाढवणारा आहे. महाराष्ट्रात भाजपने 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पण, सर्व्हेनुसार महायुतीची पिछेहाट होताना दिसत आहे.
हे वाचलं का?
भाजपने महाविकास आघाडीविरोधात ताकद वाढवण्यासाठी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना सोबत घेतली. त्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबतही घरोबा केला. पण, याचा फायदा होण्याऐवजी फटकाच बसताना दिसत आहे.
मूड ऑफ द नेशन ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रात आजघडीला लोकसभा निवडणूक झाली, तर भाजप प्रणित महायुती 22 जागांवर विजय होऊ शकते. तर महाविकास आघाडीला 26 जागा जिंकू शकते.
ADVERTISEMENT
भाजप सोबत गेलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही पक्ष मिळून 6 जागाच जिंकू शकतात, भाजप 16 जागा जिंकू शकते, असा अंदाज आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष मिळून 14 जागा जिंकू शकतात, तर काँग्रेसला 12 जागा मिळू शकतात.
ADVERTISEMENT
राज्य | एकूण जागा | भाजप (एनडीए) | काँग्रेस (इंडिया) | इतर |
उत्तर प्रदेश | 80 | 72 | 1 | 7 |
बिहार | 40 | 32 | 8 | 0 |
झारखंड | 14 | 12 | 2 | 0 |
पश्चिम बंगाल | 42 | 19 | 1 | 22 |
मध्य प्रदेश | 29 | 27 | 2 | 0 |
छत्तीसगड | 11 | 10 | 1 | 0 |
राजस्थान | 25 | 25 | 0 | 0 |
गुजरात | 26 | 26 | 0 | 0 |
गोवा | 2 | 1 | 1 | 0 |
महाराष्ट्र | 48 | 22 | 26 | 0 |
दिल्ली | 7 | 7 | 0 | 0 |
केरळ | 20 | 0 | 20 | 0 |
तामिळनाडू | 39 | 0 | 39 | 0 |
तेलंगणा | 17 | 3 | 10 | 4 |
आंध्र प्रदेश | 25 | 0 | 0 | 25 |
कर्नाटक | 28 | 24 | 4 | 0 |
हिमाचल प्रदेश | 4 | 4 | 0 | 0 |
हरियाणा | 10 | 8 | 2 | 0 |
पंजाब | 13 | 2 | 5 | 6 |
उत्तराखंड | 5 | 5 | 0 | 0 |
जम्मू-काश्मीर | 5 | 2 | 3 | 0 |
आसाम | 14 | 12 | 2 | 0 |
एकूण | 504 | 313 | 127 | 64 |
उत्तर प्रदेशात भाजपची हवा
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य आहे. उत्तर प्रदेशात 80 जागा आहेत. त्यापैकी भाजप 70 जागा जिंकू शकते. समाजवादी पार्टी 7, तर अपना दल 2, काँग्रेस 1 जागा जिंकू शकते. 2019 मध्ये भाजपने 62 जागा जिंकल्या होत्या. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अपना दल पार्टीला 2 जागा मिळाल्या होत्या.
उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या 5 जागा आहेत. या पाचही जागा भाजप जिंकेल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर इथे भाजपची मतांची टक्केवारी वाढण्याचा अंदाज आहे.
बिहारचा मूड काय?
मूड ऑफ द नेशन सर्व्हेनुसार, बिहारमधील 40 पैकी 32 जागा भाजप प्रणित एनडीए जिंकू शकते. काँग्रेसला 1 जागा, तर राजद आणि डाव्यांना 7 जागा मिळू शकतात. 2019 च्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षाने 16 जागा जिंकल्या होत्या. भाजपने 17, तर एनडीएचा भाग असलेल्या एलजेपी पार्टीने 6 जागांवर विजय मिळवला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT