Mazi Ladaki Bahin Yojana: 1500 रुपये कधी मिळणार? अजितदादांनी तारीखच सांगून टाकली!

प्रशांत गोमाणे

Ajit Pawar News : मी सातत्याने आवाहन करतोय, पण काही लोकांना तेवढेच हवंय, कुठं तरी काही तरी करायचं. तेवढा व्हिडिओ काढायचा आणि द्यायचा टाकून, तेवढेच उद्योग आहे, असा टोला देखील अजित पवारांनी विरोधकांना लगावला.

ADVERTISEMENT

 अजिबात कुणालाही एक पैसा देण्याचे कारण नाही.
mukhymantri majhi ladaki bahin yojana ajit pawar given big information monsoon session
social share
google news

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana, Ajit Pawar : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. सध्या या योजनेसाठी महिलांकडून कागदपत्रांची जमवाजमव सुरु आहे. मात्र कागदपत्रांची जमवाजमव आणि तांत्रिक बाबींमुळे अनेक महिलांना अर्ज करण्यास उशीर होतोय. त्यामुळे जरी अर्ज करण्यास उशीर झाला तरी  जुलैपासून महिलांना पैसै मिळणार आहेत, अशी मोठी माहिती अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. (mukhymantri majhi ladaki bahin yojana ajit pawar given big information monsoon session) 

अजित पवार सभागृहात बोलत होते. लाडकी बहिण योजनेवर (majhi ladaki bahin yojana)  महिलांना आवाहन करताना अजित पवार म्हणाले की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणालाही एक रुपयाची दमडी देखील देऊ नका.   कुणी मागितले तर आमच्या लक्षात आणून द्या. त्यामुळे अजिबात कुणालाही एक पैसा देण्याचे कारण नाही. माझी माता भगिणींना पुन्हा विनंती आहे, असे अजित पवार म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : Uddhav Thackeray : ठाकरेंची मोठी खेळी, भाजपला देणार जबर झटका

मी सातत्याने आवाहन करतोय, पण काही लोकांना तेवढेच हवंय, कुठं तरी काही तरी करायचं. तेवढा व्हिडिओ काढायचा आणि द्यायचा टाकून, तेवढेच उद्योग आहे, असा टोला देखील अजित पवारांनी विरोधकांना लगावला. 

अजित पवारांनी यावेळी या योजनेचा निधी नेमका कधी खात्यात येणार आहे. याची तारीख देखील सांगितली आहे. ''हे पैसे तुमच्या डायरेक्ट खात्यावर, तुमच्या अकाऊंटला येणार आहेत. जरी जुलैमध्ये तुमचा अर्ज भरून नाही झाला आणि ऑगस्टमध्ये जरी झाला तरी जुलैपासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. त्यासाठीचे आम्ही नियोजन आम्ही केलेले आहे, असे अजित पवारांनी सांगितले आहे. 

खरं तर अर्ज करण्यासाठी आणि दाखले मिळवण्यासाठी महिलांनी तलाठी कार्यालये आणि सेतु कार्यालयावर मोठी गर्दी केली आहे. या गर्दीमुळे अर्ज करण्यास उशीर होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांच्या सभागृहातील या घोषणेने महिलांना दिलासा मिळणार आहे. 

हे ही वाचा : Majhi Ladki Bahin योजनेत मोठा बदल, घरोघरी येणार टीम; काय आहे सातारा पॅर्टन?

हे वाचलं का?

    follow whatsapp