मुंबई Tak Impact: लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून लाच घेणाऱ्या तलाठ्यावर मोठी कारवाई!

मुंबई तक

ADVERTISEMENT

आदिती तटकरेंनी तलाठ्याला केलं निलंबित..
आदिती तटकरेंनी तलाठ्याला केलं निलंबित..
social share
google news

अकोला: माझी लाडकी बहीण या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी आलेल्या महिलांकडून  अकोल्यातील तलाठी पैसे घेत असल्याचे वृत्त मुंबई Tak ने दाखवताच संपूर्ण राज्यात खळबळ माजली. मुंबई Tak च्या याच वृत्ताची दखल घेत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे संबंधित तलाठ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली.  (mumbai tak impact suspension action on talathi of akola who took bribe from women for majhi ladaki bahin yojana minister aditi tatkare gave information on twitter)

ADVERTISEMENT

अकोल्यात तलाठी महिलांकडून लाच घेत असल्याचं जे वृत्त मुंबई Tak ने दाखवलं होतं. त्याच ट्विटला रिप्लाय देत मंत्री आदिती तटकरेंनी तलाठ्यावर कारवाई केली असल्याची माहिती दिली. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की, 'सदर बातमीची नोंद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.'

हे ही वाचा>> एका कुटुंबातील किती महिलांना मिळणार 1500 रुपये?, फडणवीसांची मोठी घोषणा

अकोल्यात नेमकं काय घडलं?

राज्य सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण या योजनेची अर्थसंकल्पात घोषणा केली. त्यानंतर राज्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि त्याचा अर्ज भरण्यासाठी महिला तलाठी कार्यालयासमोर मोठी गर्दी करत आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यादरम्यान या योजनेचे अर्ज भरताना महिलांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ हा समोर आला होता. अकोल्यातून देखील अशाच स्वरूपाचा व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये अकोल्यातील तलाठी राजेश शेळके हा महिलांकडून लाच घेत असल्याचं दिसून आलं. दरम्यान, याबाबतचं वृत्त मुंबई Tak ने दाखवताच याबाबत एकच खळबळ उडाली.

हे ही वाचा>> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा PDF फॉर्म इथून करा डाऊनलोड!

सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला हा अनिवार्य होता.  उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी पटवारीचा दाखला देखील तितकाच महत्वाचा असतो. त्यासाठी अकोल्यातल्या मोठी उमरी भागातल्या एका तलाठी कार्यालयावर महिलांची प्रचंड गर्दी झाली होती. या दरम्यान तलाठी चक्क पटवारीचा दाखला देण्यासाठी महिलांकडून 30 रुपयांपासून ते 60 रुपये घेत होता.

ADVERTISEMENT

अमरावती पाठोपाठ अकोल्यात देखील तलाठी पैसे घेतानाचा हा व्हिडिओ समोर आल्याने लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली महिलांची लूट सुरू असल्याचं दिसून आलं. त्यामुळे याबाबतचं वृत्त दाखवताच सरकार देखील खडबडून जागं झालं. यानंतर सदर बातमीची नोंद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT