Santosh Deshmukh Murder: 'वाल्मिक कराडच्या आदेशावरूनच खून झाला', सुरेश धस प्रचंड आक्रमक

मुंबई तक

'वाल्मिक कराड याच्या आदेशावरूनच खून झाला', असा थेट आरोप आता भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी चार्जशीट दाखल झाल्यानंतर ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आता सगळ्यात खळबळजनक माहिती समोर आली आहे. या हत्येचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड हाच आहे अशा थेट आरोप सीआयडीने चार्जशीटमध्ये केला आहे. एवढंच नव्हे तर खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या हे तीनही गुन्हे एकत्रित करून ही चार्जशीट दाखल केली असल्याचं आता समोर आलं आहे. 

दरम्यान, हे प्रकरण पहिल्या दिवसापासून उचलून धरलेल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आता त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी फोनवरून बोलताना त्यांनी आता अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.

हे ही वाचा>> Walmik Karad हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टर माईंड, CID चं आरोपपत्र

प्रत्यक्ष वाल्मिक कराडच्या आदेशावरूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली. असा थेट आरोप आता सुरेश धस यांनी केला आहे. पाहा नेमकं काय म्हणाले सुरेश धस.

वाल्मिक कराडविरोधात चार्जशीट दाखल, सुरेश धस प्रचंड आक्रमक

चार्जशीट झाल्यानंतर सुरेश धस म्हणाले की, 'वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड, मुख्य सूत्रधार, याचा आका.. सगळं काही तोच आहे. हा आकाच सगळं काही करत होता. संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये यांनी धुमाकूळ घातला होता. जे गुंड प्रवृत्तीचे लोकं आहेत यांना सहकार्य करणं, मदत करणं, पैसे देणे...  कारण पैसा जास्त झाला ना.' 

'बोगस पैसे उचलायचे आणि या अशा गँग तयार करायच्या, या टोळ्यांना अभय द्यायचं यांच्याकडून हवी ती कामं करून घ्यायची. अशा पद्धतींचा उद्योग यांचा संपूर्ण जिल्ह्यात सुरू होता.'

हे ही वाचा>> Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडचा हत्येत सहभाग, चार्जशीटमध्ये खळबळजनक आरोप

'SIT ने जे मांडलंय ते योग्य आहे. मूळ सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे आणि बाकीचे प्यादे आहेत. तीनही केसची जंत्री एकत्रित एसआयटीने केल्याचं दिसतंय. कलम 34 प्रमाणे सामूदायिक जबाबदारी सगळ्यांची आहे.'
 
'म्हणजे खून करायला जरी प्रत्यक्षात त्या जागेवर वाल्मिक कराड नसला तरी वाल्मिक कराडच्याच आदेशवर खून झालाय. त्यामुळे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच आहे.' 

'दोन नावं वगळली असं म्हटलं जात आहे. जर त्यांचा संबंध नसेल तर ती नावं वगळली असतील. त्याबद्दल आमचं काही मत नाही. परंतु आमचं जे देशमुख कुटुंब आहे आणि आम्ही जे आहोत यामध्ये जे पोलीस आहे.. महाजन आणि राजेश पाटील या लोकांचा त्यात सहभाग आहे. कदाचित पुरवणी आरोपपत्र दाखल करायची वेळ आली तर ते करावं. त्यात पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करावं अशी आमची मागणी मुख्यमंत्र्यांकडे असणार आहे.' असं सुरेश धस यावेळी म्हणाले. 

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर आता वाल्मिक कराड हा अधिक अडचणीत सापडला असून धनंजय मुंडे यांच्या देखील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp