Ratnagiri Lok Sabha: राणेंची भेट घेतली अन् सामंत म्हणाले, 'नारायण राणेंना माझ्या शुभेच्छा...'

मुंबई तक

Narayan Rane kiran Samant Meet, Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी शिवसेना-भाजपमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. असे असतानाच लोकसभेच्या जागेसाठी भाजपाकडून नाव चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत यांची आज कणकवलीतील राणेंच्या ओम गणेश या निवासस्थानी महत्त्वपूर्ण भेट झाली.

ADVERTISEMENT

narayan rane meet kiran samant on lok sabha election 2024 ratnagiri sindhudur lok sabha seat bjp vs shiv sena fight for seat ramdas kadam maharashtrag  politics
लोकसभेच्या जागेसाठी भाजपाकडून नाव चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत यांची आज कणकवलीतील राणेंच्या ओम गणेश या निवासस्थानी महत्त्वपूर्ण भेट झाली.
social share
google news

Narayan Rane kiran Samant Meet, Lok Sabha Election 2024 : कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमधील तिढा अद्याप काही सुटलेला नाही. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी बंधु किरण सामंत (Kiran Samant) यांच्यासाठी काहीच दिवसांपुर्वी या जागेवर दावा सांगितला होता. शिंदे गटाच्या या दाव्यानंतर भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील या जागेवर दावा केला होता. या दाव्यानंतर भाजप-शिवसेनेत वाद पेटलेला असतानाच आज दोन्ही इच्छुक उमेदवारांची एकमेकांशी भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये फारशी चर्चा झाली नसली तरी या भेटीची चर्चा सर्वदुर पसरली आहे. असे असले तरी या जागेव कुणाची वर्णी लागणार? कोणता उमेदवार लोकसभा लढवणार? याची उत्सुकता कोकणवासियांना लागली आहे.  (narayan rane, kiran samant, ramdas kadam, ratnagiri sindhudur lok sabha seat, Lok sabha election) 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसाठी शिवसेना-भाजपमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. असे असतानाच लोकसभेच्या जागेसाठी भाजपाकडून नाव चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत यांची आज कणकवलीतील राणेंच्या ओम गणेश या निवासस्थानी महत्त्वपूर्ण भेट झाली.  या भेटीत दोघांमध्ये फारशी काही चर्चा झाली नाही. मात्र किरण सामंत यांनी नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. 

हे ही वाचा : अजितदादा माझं गृह खातं मागतील, पण मी त्यांना.. : फडणवीस

या भेटीवर किरण सामंत म्हणाले की, महायुतीमध्ये वरिष्ठ ठरवतील तो उमेदवार असेल, असे सांगत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे इच्छुक असतील तर त्यांना देखील माझ्या शुभेच्छा असे महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केले आहे. आता राणे सामतांच्या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान लोकसभेच्या जागेवरून भाजप व शिवसेनेमध्ये दावे प्रति दावे होत असताना किरण सामंत यांनी आज भेट घेत या लढतीबाबत उत्सुकता अजून वाढवली आहे. त्यामुळे आता लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार त्याची उत्सुकता अजून ताणली गेली आहे. 

राणे-सामंतांचा मतदार संघावर दावा 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेने लढली आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनाच लढेल. शिवसेनेने जागा लढावी,अशी माझी इच्छा आहे. पण याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले होते. एकंदरीत सामंतांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर शिवसेनेचा दावा सांगितला होता. 

दरम्यान गुरूवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्‍या जागेसंबंधी आपला हक्‍क दाखवित आहेत. रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. 

हे ही वाचा : Sanjay Gaikwad: शिंदे गटाच्या आमदाराने तरूणाला लाठीने फोडून काढलं

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्गची ही जागा शिवसेना-भाजप युतीवेळी शिवसेनेच्या वाट्याला येते.त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना या जागेवर दावा करू शकते आणि तसे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अनेकदा बोलूनही दाखवले आहे. उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत हे या जागेवरून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे जागावाटपात ही  जागा शिवसेनेकडून ठेवून किरण सामंतांना मिळवण्यासाठी उदय सामतांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता नारायण राणेंनी ट्विट करून या जागेवर भाजपचा दावा केला आहे. त्यामुळे आता या जागेवर शिवसेना-भाजपमध्ये काय तोडगा निघतो? कोणता उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp