“उद्धव ठाकरेंमुळेच ‘मविआ’च सरकार गेलं” : शरद पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

NCP Cheif Sharad Pawar slams Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray in lok maze sanagati
NCP Cheif Sharad Pawar slams Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray in lok maze sanagati
social share
google news

मुंबई : “महविकस आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्या टप्प्यात माघार घेतली. संघर्ष न करता त्यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला,” असं म्हणतं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पवार यांचे राजकीय आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित अवृत्तीचे प्रकाशन आज (2 मे) पार पडले. याच पुस्तकात पवार यांनी ठाकरे यांच्याविषयी भाष्य केलं आहे. (NCP Cheif Sharad Pawar slams Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray in lok maze sanagati)

ADVERTISEMENT

काय म्हणाले शरद पवार?

उद्धव ठाकरे यांच्या जमेच्या बाजू :

मुख्यमंत्री झाल्यावरही उद्धव ठाकरेंच्या शर्ट-पँट अशा मुंबईकर मध्यमवर्गीयाच्या पोषाखात सहजपणानं वावरण्याचं एक अप्रूप सर्वांनाचे होते. कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर त्यांनी फेसबुकद्वारे साधलेला संवाद सहज आणि आपुलकीचा असल्यानं मध्यमवर्गाला ते फारच भावलं. त्यांना सहकार्य केलं पाहिजे, असं या वर्गाला वाटत होतं. मंत्रालयातल्या प्रशासकीय वर्गातही त्यांच्याविषयी आपलेपणाची भावना होती. मंत्रालयातला वर्ग तीन आणि चारचा कर्मचारी सामान्य मुंबईकर आहे. या वर्गानं उद्धवना मनःपूर्वक साथ दिली. या सर्व झाल्या उद्धव यांच्या जमेच्या बाजू!

हे ही वाचा : बंडाच्या चर्चेवर अजित पवारांनी उद्धव ठाकरेंसमोरच सांगितला प्लॅन

बाळासाहेबांसमवेतची संवादातली सहजता उद्धवशी बोलताना नव्हती :

मात्र उद्धवना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादाही होत्या. मुख्यमंत्री असताना त्यांचं मंत्रालयात फक्त दोनदा जाणं आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं. बाळासाहेबांसमवेतची संवादातली सहजता उद्धवशी बोलताना नव्हती. त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती याचा विचार करूनच भेटण्याची वेळ ठरवावी लागत असे. ‘महाविकास आघाडी’चं जनकत्व माझ्याकडे होतं, त्यामुळे पालकाच्या भूमिकेतूनच मी याकडे पाहत होतो. रश्मी ठाकरे यांच्याशी बोलताना उद्धव यांच्या प्रकृतीचं वर्तमान समजत असे. मग मी स्वतःच त्यांची विचारपूस करण्यासाठी ‘मातोश्री’वर वडिलकीच्या नात्यानं गेलो होतो. आमच्यापर्यंत आलेले काही विषय उद्धवशी संपर्क करून मी कानांवर घालायचो, काय करायला हवं, याबाबतही सूचना करायचो. त्या सूचनांवर कार्यवाही होत असे, असाही माझा अनुभव आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : संजय राऊतांकडून तोंडभरून कौतूक, पण अजित पवारांनी ‘तो’ उल्लेखही टाळला

पहिल्याच टप्यात माघार घेतली :

राज्याच्या प्रमुखाला राज्यातल्या घडामोडींची बित्तंबातमी बवी. त्याचं यावर बारीक लक्ष हवं. उद्या काय होऊ शकेल, याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी आणि त्यानुसार आजच काय पावले उचलायला पाहिजेत, हे ठरवण्याचं राजकीय चातुर्य हवं. या सर्व बाबतीत आम्हाला कमतरता जाणवत होती. अनुभव नसल्यानं हे घडत असले, तरी ते टाळता आलं असतं. राजकारणात सत्ता राखण्यासाठी वेगाने हालचाली कराव्या लागतात. परंतु ‘महाविकास आघाडी’ सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात त्यांनी पहिल्याच टप्यात माघार घेतली. त्याचही कारण शारीरिक हेच असावं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बहुतेक सर्व मंत्री मुरब्बी असल्यामुळे, त्यांना दांडगा प्रशासकीय अनुभव असल्यामुळे अशा काळातही सरकार कृतिशील राहिलं.

उद्धव ठाकरेंच्या व्हिडीओ कॉन्फरन्सींगवर भाष्य :

अजित मंत्रालयात कायम उपलब्ध असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला निर्णयप्रक्रियेमध्ये काळजी करण्याची आवश्यकता भासली नाही. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात वास्तविक महाराष्ट्र हॉटस्पॉट असूनही मंत्री राजेश टोपे यांनी त्या वेळी केलेली कामगिरी फारच स्पृहणीय होती. राजेश सर्व निर्णयांवर चौफेर लक्ष ठेवून होता. उद्धवही प्रशासनाच्या संपर्कात होते. परंतु ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. राजेश आणि राष्ट्रवादीचे सारे मंत्री प्रत्यक्ष मैदानात सक्रिय होते. आपल्या विचारांच्या हातात राज्य असताना संकटग्रस्त स्थितीत समाजाला दिलासा देण्याची नैतिक जबाबदारी आपलीच आहे. याच भावनेतून माझ्यासह सर्व सहकारी काम करत होते.

ADVERTISEMENT

शिवसेना नेतृत्व कमी पडलं :

‘महाविकास आघाडीचं सरकार हा फक्त सत्तेचा खेळ नव्हता. अन्य पक्षांना दडपून टाकत, लोकशाहीतल्या इतर पक्षांचं महत्त्व येनकेन प्रकारे संपवत राजकीय वर्चस्व निर्माण करण्याच्या भाजपाच्या वृत्तीला ते सडेतोड उत्तर होतं. ‘महाविकास आघाडी’चं सरकार हे भाजपाला देशभरात सर्वात मोठं आव्हान होतं. हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होणार, याची कल्पना होतीच. आम्ही आमच्या पातळीवर असे डावपेच हाताळायला भक्कम होतो. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यानं शिवसेनेतच वादळ माजेल, या मात्र आम्हाला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडलं. संघर्ष न करता उद्धवनी राजीनामा दिल्यामुळे ‘महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला. राजकारणातल्या अतर्क्यतेचा आणखी एक अनुभव गाठीशी जमा झाला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT