Jitendra Awhad: "हत्येच्या दोन महिने आधी दोन कोटींची खंडणी...", संतोष देशमुख हत्याप्रकरणी आव्हाडांनी उडवली खळबळ

मुंबई तक

Jitendra Awhad On Santosh Deshmukh Murder Case:  बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला 4 जानेवारीला पुण्यातून अटक केली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट?

point

"वाल्किम कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले..."

point

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

Jitendra Awhad On Santosh Deshmukh Murder Case:  बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला 4 जानेवारीला पुण्यातून अटक केली. तसच सिद्धार्थ सोनवणेला मुंबईतून बेड्या ठोकल्या. या प्रकरणी तिन्ही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी ठोठावण्यात आलीय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात खळबळजनक माहिती उघड केली आहे.

जितेंद्र आव्हाड 'मुंबई तक'शी बोलताना काय म्हणाले?

"वाल्मिक कराड खुनात आहेत, त्याचं कारण सुदर्शन घुले आहे. सुदर्शन घुले हा खंडणीतही आहे. खंडणीत वाल्किम कराडही आहे. वाल्किम कराडच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले तिथे गेला. त्यानंतर मर्डर झाला. हत्येमागचं कारण म्हणजे खंडणी. ही खंडणी सत्य नारायणाच्या महापूजेची नाही ना..11 रुपयांची वर्गणी मागायला गेले होते. दोन कोटींची खंडणी आहे यात..हत्येच्या दोन महिने आधी दोन कोटींची खंडणी मागितली होती. दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात इलेक्शन होतं. इलेक्शनसाठी हे खंडणी मागतात. दोन कोटी रुपये पॉलिटीकल फंडिंगचा पैसा होता. तो नाकारल्यामुळे त्या कंपनीवर राग होता. म्हणून त्या अधिकाऱ्याला मारलं, अशी खळबळजनक प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.

हे ही वाचा >> "कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला, तर...", संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन CM फडणवीसांनी दिला इशारा

आव्हाड पुढे म्हणाले, "हे सर्व बघितल्यावर मला हे दाऊद बिऊद फार छोटे वाटायला लागले आहेत. दाऊद घाबरून देश सोडून पळाला. हा बीडमध्ये राहून हे सर्व धंदे करतोय. याच्या उत्पन्नाचं कॅल्क्यूलेशन केलं तर, राख, मटका, दारू आमूक तमुक..दोनशे चारशे कोटीच्या खाली नसेल हा. पाच सहा महिन्यात एवढे पैसे काढत असतील. राखेचं टेंडर न काढण्यामागची सरकारची भूमिका काय आहे? या एका खूनाने काही होणार नाही. बीडमध्ये झालेल्या खूनांच्या मालिकेचा तपास व्हायला पाहिजे".

हे ही वाचा >> Mumbai Crime News : वासनांध बापानं पोटच्या मुलीलाही सोडलं नाही, शेवटी लेकीनं आपबीती मैत्रिणीला सांगितली, मुंबईतील संतापजनक घटना...

"जोपर्यंत एखादा जज त्याचा तपास करत नाही, तोपर्यंत पोलीस यंत्रणा सरळ काम करणार नाही. सीआयडीच्या एसआयटीतून काही बाहेर निघणार नाही. तुमची भीती तर वाटली पाहिजे ना..भीतीच नाही. भीती असती तर तो पोलीस स्टेशनला चालत गेला नसता ना..तो पोलीस स्टेशनला हजर होतोय म्हणजे पोलिसांची नाचक्की आहे. तो हजर होतोय हे माहित झाल्यावर पोलिसांनी नाकेबंदी करून या सर्व गाड्या बंद करायला हव्या होत्या. त्याला गाडीतून फरफटत न्यायला हवं होतं. पोलिसांची इज्जत राहिली असती", असंही आव्हाड म्हणाले.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp