'आता 'त्यांनी' धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर...' अंजली दमानिया संतापल्या

मुंबई तक

वाल्मिक कराडविरोधात चार्जशीट दाखल झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: संतोष देशमुख हत्या प्रकरणी चार्जशीट दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सातत्याने मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. पण आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. (now if ajit pawar and devendra fadnavis do not demand dhananjay munde resignation maharashtra should wake up anjali damania is furious)

संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने चार्जशीट दाखल केल्यानंतर अंजली दमानिया यांनी थेट असं म्हटलंय की, 'जर धनंजय मुंडे याचा आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला नाही तर खरंच महाराष्ट्राने पेटून उठलं पाहिजे.' असं विधान त्यांनी केलं आहे.  

अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या? 

'जे-जे पुरावे म्हणून दिलं होतं त्याचा क्रम पाहिला तर 6 डिसेंबरला जी मारामारी झाली होती.. मुळात कसं आहे की, या लोकांनी मुद्दाम.. म्हणजे राजकीय दबाव होता. म्हणून या तीन वेगवेगळ्या केसेस केल्या होत्या. त्यात खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तीन वेगळ्या केसेस होत्या. पण आता तीनही केसेस एकत्र केल्याने आता खात्री पटली आहे की, यामध्ये याच्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव होता. तो धनंजय मुंडे यांचाच होता. म्हणून पहिल्या दिवसापासून मी म्हणत होते की, धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे तो एवढ्याच साठी.'

हे ही वाचा>> Santosh Deshmukh Murder: 'वाल्मिक कराडच्या आदेशावरूनच खून झाला', सुरेश धस प्रचंड आक्रमक

'आज सिद्ध झालंय की, ही तीन वेगवेगळी प्रकरणं कधीही नव्हती. सुरुवात झाली 29 नोव्हेंबरला. ज्यामध्ये आधी खंडणी मागितली गेली. सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली. त्यानंतर 6 डिसेंबरला तिथे गेल्यानंतर जी मारामारी झाली त्यामध्ये आधी त्यांच्यावर सगळी कलमं लागली होती. पण त्यांची बेल करायला बालाजी तांदळे नावाचा एक माणूस पोहोचतो.' 

'या सगळ्यांचा जामीन करतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7 तारखेला सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडशी बोलतात. की, 'यापुढे अशी माणसं जर आपल्या आड यायला लागली तर त्यांचा काटा काढायला पाहिजे.' एवढंच नाही तर 8 तारखेला विष्णु चाटे आणि सुदर्शन घुले हे तिरंगा हॉटेलमध्ये भेटतात. त्या हॉटेलमध्ये भेटून चर्चा करतात की, संतोष देशमुख आडवा आला तर त्याला संपवायचं.'

हे ही वाचा>> Beed: "जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत..." वाल्मिक कराडवर आरोपपत्र दाखल होताच धनंजय देशमुखांची मोठी प्रतिक्रिया

'मला ना ही भाषा आणि हे सगळं बघून इतका राग आणि एवढी चीड येतेय की, ही माणसं नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. यामधील अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. त्यांना जे डिजिटल पुरावे मिळाले आहेत जो व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल केला गेला. त्यामधून दिसतंय की, सगळ्यांनी हे कृत्य होताना पाहिलं आहे. आतापर्यंत हे आपण ऐकलं होतं. पण ते आता चार्जशीटमध्ये रेकॉर्ड झालं आहे.' 

'इतकं निर्दयी कृत्य होताना आपण कधीही ते बघू शकणार नाही. पण ही जर माणसं जर बघत असतील तरी ती माणसं नाहीतच.. ही क्रूर जमात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. नाही झाली तर खरंच हे अक्षम्य होईल.' 

'पोलिसांनी आता असंही रेकॉर्ड केलंय की, गेल्या 10 वर्षात यांनी 11 गुन्हे केले आहेत. मी मानत नाही की, 10 वर्षात अकराच गुन्हे गेले आहेत या सिंडीकेटने. यांनी या काळात किमान 25 पट अधिक गुन्हे केले असतील. पण एफआयआर होत नाही.' 

'यावरून कराडची दहशत किती होती हे लक्षात येतं. तिथले जे लोकं होतं बीडचे.. ते असंख्य मेसेज पाठवत आहे. प्रत्येक दुकानांकडून यांनी खंडणी फिक्स असते, त्यांचे हप्ते फिक्स असतात. तेवढे पैसे त्यांना पोचवावेच लागतात. हे इतकं मोठं सिंडीकेट काम करतंय. ते कोणाच्या आशीर्वादाने? ते फक्त आणि फक्त धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने.'   

'वाल्मिक कराड यांना वाचवायचं म्हणून धनंजय मुंडे यांनी डोकं लावून हे तीन गुन्हे वेगवेगळे करायला लावले. हा माझा थेट आरोप म्हणायचा आहे तर म्हणा..' 

'पण धनंजय मुंडे याला आता जर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला नाही तर खरंच महाराष्ट्राने पेटून उठलं पाहिजे.' असं म्हणत अंजली दमानिया यांनी या सगळ्या प्रकाराबाबत आपला राग व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp