Narendra Modi : PM मोदींच्या मराठीतून वारकऱ्यांना वारीच्या शुभेच्छा, काय म्हणाले?

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

pm narendra modi greeting in marathi pandharpur wari on warkari 29400 crores lay foundation stones and inaugurate project
तिसऱ्या टर्ममध्येच एनडीए सरकार तीन पट अधिक गतीने काम करेल
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार

point

तिसऱ्या टर्ममध्येच एनडीए सरकार तीन पट अधिक गतीने काम करेल

point

संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग दोनशे किमी पूर्ण झाले आहे.


PM Narendra Modi News : तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी गोरेगावातील नेस्को प्रदर्शन केंद्रात  रस्ते, रेल्वे व बंदर प्रकल्पांचे सुमारे 29,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी मोदींच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमातून जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी मराठीतून वारकऱ्यांना वारीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  (pm narendra modi greeting in marathi pandharpur wari on warkari 29400 crores lay foundation stones and inaugurate project) 

ADVERTISEMENT

आज मला महाराष्ट्र आणि मुंबईतील 30 हजार कोटींच्या प्रकल्पाचे उद्धघाटन आणि पायाभरणी करण्याची संधी मिळाली. या योजनेतून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. 76 हजार कोटी रुपयांचे प्रोजेक्टमधून 10 हजार पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तसेच तिसऱ्या टर्ममध्येच एनडीए सरकार तीन पट अधिक गतीने काम करेल, असा विश्वास देखील मोदींनी व्यक्त केला. 

हे ही वाचा : Maharashtra MLC Election : "ऐनवेळी असे का केले?", ठाकरेंना कपिल पाटलांचा संतप्त सवाल

पालखी मार्गांचा भाविकांना होणार लाभ

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग दोनशे किमी पूर्ण झाले आहे. तर संत तुकाराम महाराजांची पालखी महामार्ग देखील लवकरच पूर्ण होऊन भाविकांसाठी लाभदायी होणार आहे. दळणवळणच्या माध्यमातून राज्याची प्रगती होते, महिलांना चांगल्या सुविधा मिळतात. एनडीए सरकार हे युवा, गरीब, शेतकरी, महिलांच्या विकासासाठी काम करत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार देखील चांगले काम करत आहे.

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोगी यांनी यावेळी वारकऱ्यांना मराठीतून शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सर्व वारकऱ्यांनी मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि पंढरीच्या विठूरायाला कोटी कोटी नमन करतो, असे मोदी म्हणाले आहेत. 

नरेटिव्हवरून विरोधकरांवर हल्ला 

खोटे नरेटिव्ह मांडणाऱ्या लोकांनी आमचे काम थांबवले. हे लोक देशाच्या विकासाच्या विरोधात आहेत. त्यांचे खोटे बोलणे आपल्या देशातील लोकांना आता कळले आहे, अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Vidhan Parishad Election : "ठाकरेंची दोन मते फुटली", भाजप नेत्याने टाकला राजकीय बॉम्ब

महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान, समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. महाराष्ट्र असे राज्य आहे की, ज्याचा विकसीत भारतात मोठा वाटा आहे. महाराष्ट्रात उद्योग आहे. दुनियाची सर्वात मोठी आर्थिक केंद्र मुंबई बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. महाराष्ट्र टुरिझममध्ये दुनियातील नंबर एक राज्य बनले पाहिजे, येथे सह्याद्रीच्या पहाडीवर सफरचा रोमांच आहे. येथे छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, असे देखील मोदी म्हणाले आहेत. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT