‘मविआ’ने तो निर्णय घेतला! प्रकाश आंबेडकरांना दिलं पत्र
महाविकास आघाडीत वंचितला सामील करून घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले यांना महाविकास आघाडीच्या युतीमध्ये वंचितला समाविष्ट करण्यासाठी कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार आहे की नाही हे AICC किंवा रमेश चेन्निथला यांनी वंचितला माहिती दिलेली नाही.
ADVERTISEMENT
Mahavikas Meeting : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात महाविकास आघाडीने जोरदार तयारी सूरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहूजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेतले आहे. महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्र एक्सवर शेअऱ करून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी देखील महाविकास आघाडीचे हे निमंत्रण स्विकारलं आहे. (prakash ambedkar vanchit bahujan aghadi included in mahavikas aghadi loksabha election 2024 sanjay raut nana patol uddhav thackeray)
ADVERTISEMENT
आदरणीय श्री.प्रकाश आंबेडकर जी,@Prksh_Ambedkar @VBAforIndia pic.twitter.com/prp036Cu2S
— Nana Patole (@NANA_PATOLE) January 30, 2024
महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक आज मुंबईतील ट्रायडेंड हॉटेलमध्ये पार पडली आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर या बैठकीला उपस्थित होते.मात्र या बैठकीत त्यांनी वंचितचा अपमान झाल्याचा आरोप केला होता. या बैठकीनंतर आता नाना पटोले आणि संजय राऊत यांनी पत्र एक एक्सवर शेअऱ करून वंचित बहूजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेण्यात आल्याची माहिती दिली.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Manoj Jarange : 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण, रायगडाच्या पायथ्यावरून जरांगेंची गर्जना
पत्रात काय?
”देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. 2024 साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे”, अशी आमची भूमिका आहे, असं या पत्रात म्हटलं आहे.
वंचीत बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाला.
ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे 2 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील.
वंचीत मुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल.भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल.@Prksh_Ambedkar… pic.twitter.com/BpkyWDvlt9— Sanjay Raut (@rautsanjay61) January 30, 2024
ADVERTISEMENT
”30 जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे”, असं या पत्राद्वारे जाहीर करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
महाविकास आघाडीत वंचितला सामील करून घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जरी वंचितच्या राज्य उपाध्यक्षांना मविआच्या बैठकीत योग्य सन्मान दिला गेला नाही. नाना पटोले यांना महाविकास आघाडीच्या युतीमध्ये वंचितला समाविष्ट करण्यासाठी कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार आहे की नाही हे AICC किंवा रमेश चेन्निथला यांनी वंचितला माहिती दिलेली नाही. तरीही आम्ही महाविकास आघाडीत सामील होऊ, आणि पुढील बैठकीला उपस्थित राहू, कारण भाजप-आरएसएसचा पराभव करणे हे वंचितले लक्ष्य आहे.
Even though VBA’s State Vice-President was not given due respect in the MVA meeting and VBA is not aware nor informed by AICC or by Ramesh Chennithala whether Nana Patole is having any authority to sign any letters for including VBA in MVA alliance, we will join MVA in the next…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 30, 2024
हे ही वाचा : सारख्या तक्रारी, अभ्यासात लक्ष नाही… खोड्या करतो म्हणून बापाने पोटच्या लेकरालाच संपवलं!
महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितचा अपमान
महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक मुंबईतील ट्रायडेंड हॉटेलमध्ये पार पडली आहे. या बैठकीत पहिल्यांदाच वंचित आघाडी सामील झाली होती. वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी डॉ. पुंडकर यांनी बैठकीत आपला अजेंडा महाविकास आघाडीसमोर सादर केला. तेव्हा आम्ही चर्चा करून सांगतो असं म्हणून त्यांना 1 तास बैठकी बाहेर बसवून ठेवण्यात आले आणि आतमध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बैठक सुरु होती,असा आरोप धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला आहे.
आम्ही ठरवलेला कॉमन मिनीमन प्रोग्राम मविआला दिल्यानंतर मला बैठकीच्या रूममधून बाहेर बसायला लावलं. मला साधारण एक तासाहून अधिक वेळ बैठकीच्या बाहेर ठेवलं गेलं, त्यामुळे मविआने वंचित बहुजन आघाडीचा अपमान केला आहे,असा आरोप धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT