राजन साळवींचा उद्धव ठाकरेंकडून पाणउतारा, 'मातोश्री'मधील प्रचंड खळबळजनक Inside स्टोरी
Rajan Salvi vs Uddhav Thackeray: 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणाऱ्या राजन साळवी यांचा बराच अपमान करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वाचा इनसाइड स्टोरी.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राजन साळवी आणि उद्धव ठाकरेंमध्ये खडाजंगी

उद्धव ठाकरेंनी केला राजन साळवींचा पाणउतारा

मातोश्रीमधील नेमकी इनसाइड स्टोरी
Rajan Salvi insult by Uddhav Thackeray: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना (UBT) पक्षाला मोठा धक्का बसला. कारण त्यांचे अवघे 20 आमदारच महाराष्ट्रात निवडून आले. अशातच आता पक्षातील नाराजी वाढू लागली आहे. दोनच दिवसांपूर्वी राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर आज (4 जानेवारी) त्यांनी 'मातोश्री'वर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पण याच भेटीत दोघांमध्ये बरीच मोठी खडाजंगी झाल्याचं आता समोर आलं आहे. (rajan salvi insult by uddhav thackeray a very sensational inside story in matoshree)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंनी राज साळवी यांचा सगळ्यांसमोरच पाणउतारा केला. त्यामुळे साळवी बरेच दुखावले गेल्याचं बोललं जात आहे.
'मातोश्री'वर नेमकं काय घडलं? वाचा Inside स्टोरी
मिळालेल्या माहितीनुसार, राजन साळवी यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ज्या भेटीतल कोकणातील निकालावरून मातोश्रीवर बरीच खडाजंगी झाली.
राजन साळवी यांच्यासोबत तालुकाप्रमुख, मुंबई आणि स्थानिक संपर्क प्रमुख देखील उपस्थित होते. राजन साळवी यांना राजापूर मतदारसंघातून पराभवाला सामोरं जावं लागलं. याच पराभवचं खापर साळवींनी शिवसेना नेते विनायक राऊत यांच्यावर फोडलं. यावेळी साळवींनी उद्धव ठाकरेंकडे तक्रारींचा पाढाच वाचला.
हे ही वाचा>> CM Devendra Fadnavis : "दादागिरी खपवून घेतली जणार नाही...", 'त्या' प्रकरणावरून भर सभागृहात फडणवीस संतापले
मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्वांसमोरच राजन साळवींचा पाणउतारा केला. उद्धव ठाकरेंनी राजन साळवींनाच खडे बोल सुनावले आणि विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबादार नाही का? असा उलट सवाल केला.
त्यावर राजन साळवींनी म्हटलं की, 'विनायक राऊतांना 21 हजाराचा लीड दिलं. तर त्यांच्या पराभवाला मी जबाबदार कसा?' असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाच सवाल केला.
त्यावर उद्धव ठाकरे आणखी संतापून म्हणाले की, 'मग आता काय करू? विनायक राऊतांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखाला काढू?'
त्यावर राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना स्पष्टपणे सांगितलं की, 'तो आपला निर्णय आहे.'
हे ही वाचा>> Rajan Salvi : उद्धव ठाकरेंची साथ सोडणार, राजन साळवी 'या' पक्षात प्रवेश करणार, कोकणात मशालीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह?
दरम्यान, हे सगळं प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. राजन साळवींनी ठाकरेंकडे अशीही तक्रार केली की, 'विनायक राऊत यांचे उदय सामंत, किरण सामंत यांच्यासोबत व्यावहारिक संबंध आहेत.'
त्यावर उद्धव ठाकरेंचा पारा अधिकच चढला आणि त्यांनी साळवींना थेट सांगितलं, 'तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपात...'
राजन साळवी भाजपमध्ये जाणार?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजन साळवी हे ठाकरेंसोबतच कायम राहिले. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते नाराज असल्याचं समोर आलं. त्यातच मागील दोन दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदेंची शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली.
अशावेळी आपली नेमकी नाराजी का आहे यासाठी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पण तिथे त्यांचाच पाणउतारा करण्यात आला. त्यामुळे आता राजन साळवी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.