Sushma Andhare Tweet : "विध्वंसक प्रवृत्तीशी संग..", शिंदेंनी विद्यमान आमदाराचं तिकीट कापताच सुषमा अंधारे कडाडल्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sushma Andhare On Shrinivas Vanga
Sushma Andhare On Shrinivas Vanga
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिंदेंनी तिकीट कापल्यानंतर पालघरचे विद्यमान आमदार ढसाढसा रडले

point

सुषमा अंधारेंनी शिंदे गटासह त्या विद्यमान आमदारावर केला हल्लाबोल

point

सुषमा अंधारे ट्वीटरवर काय म्हणाल्या?

Sushma Andhare Tweet On Shrinivas Vanga: एकनाथ शिंदेंनी तिकीट कापल्यानंतर पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले. उद्धव ठाकरे देव माणुस आहेत. मी चुकलो, मला त्यांची माफी मागायचीय, अशी भावनिक प्रतिक्रिया वनगा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी मोठं ट्वीट केलं आहे. "विध्वंसक प्रवृत्तीशी संग केला की, शेवट सर्वनाशाकडेच नेणारा असतो,", असं म्हणत अंधारे यांनी शिंदे गटासह वनगा यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. 

ADVERTISEMENT

सुषमा अंधारेंचं ट्वीट जसच्या तसं

विध्वंसक प्रवृत्तीशी संग केला की, शेवट सर्वनाशाकडेच नेणारा असतो..
तुकोबाराय म्हणतात,अरे देवा झाला असंगाशी संग | सारी मनःशांती | दूर गेली|| नेणले स्वहित | नेणले परहित | खलांशी भांडता | जन्म गेला|| जैसे दोन श्वान| टवकारून कान | ईचकोन दात | समोरा समोर || पसरला जगी | लबाडांचा मेळा

हे ही वाचा >>  Shiv Sena UBT: निवडणुकीआधीच ठाकरेंना मोठा धक्का, 'या' उमेदवाराने अचानक घेतली माघार, म्हणाले मी...

राज्याची विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार असून सर्वच पक्षांनी जवळपास सर्व उमेदवार घोषित केल्याचं समोर आलं आहे. अशातच पालघर विधानसभा मतदारसंघाची तुफान चर्चा रंगली आहे. कारण शिवसेनेच्या बंडात 40 आमदारांमध्ये सहभागी झालेले पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापण्यात आलं आहे.  शिंदे गटाने वनगा यांची उमेदवारी नाकारल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. भारतीय जनता पक्षाने माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे-ठाकरे यांच्यात राजकीय सामना रंगणार नाही, हे निश्चितच झालं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> BJP 3rd Candidates List: भाजपची तिसरी यादी जाहीर, 'या' नेत्याला अखेर तिकीट मिळालंच!

माझ्या वडिलांपासून केलेलं प्रामाणिकपणाचं हेच फळ मिळतंय का..मला प्रत्येक वेळी डावललं. खासदारकीच्या वेळीही तसच केलं. तू निवडून येत नाही, असं मला सांगितलं. मी प्रामाणिकपणे थांबलो. पण प्रत्येक वेळी गावितला पुढं केलं. मतदारसंघात चांगलं काम केल्यानंतर संधी मिळते आणि अशाप्रकारे मला डावललं जातं, असं म्हणत वनगा माध्यमांना प्रतिक्रिया देताना ढसाढसा रडले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT