Uddhav thackeray : ''हिंमत असेल तर...'', अमित शहांना ठाकरेंनी दिले थेट चॅलेंज
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांनी या पुतळा दुर्घटनेवरून शिंदेवर टीका केला आहे. ''मिंधे दाढी खाजवत म्हणतात वाऱ्याने पुतळा पडला, अहो वाऱ्याने तुमची दाढी नाही ना उडत, मग प महाराजांचा पुतळा पडतो बेशरमपणाने सांगता, वाऱ्याने पडला'' अशी टीका ठाकरेंनी शिंदेवर केली आहे.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray Challenge Amit Shah: ''अमित शहाजी बंद दाराआडचे धंदे तुमचे सोडा, हिंमत असेल तर इकडे मैदानात या शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा'', असे थेट आव्हान शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना दिले आहे. ठाकरेंच्या या चॅलेंजवर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (uddhav thackeray challenge amit shah on nagpur rally criticize eknath shinde on malavan four chhatrapati shivaji maharaj statue collape inquiry report)
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरात ठाकरेंची आज सभा पार पडली आहे. या सभेत बोलताना ठाकरेंनी महायुती सरकार आणि अमित शहांवर जोरदार हल्ला चढवला. ''मध्ये जे नागपूरमध्ये येऊन गेले एक दोन दिवसांपूर्वी ज्यांना मी बाजारबुनग (अमित शहा) म्हटलं होतं. मला औरगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे असे बोलेले होते. यावर मी त्यांना तुम्ही अमित शाह नाही तर अहमदशाह अब्दाली आहात असं म्हटलं होतं. आणि चार दिवसांपूर्वी नागपूरात येऊन गेले आणि बंद दाराआड चर्चा केली. उद्धव ठाकरेंना संपवा, पवारांना संपवा, त्यांचा पक्ष फोडा, कार्यकर्त्यांना फोडा. अहो अमित शाह जी बंद दाराआडचे तुमचे धंदे आता संपवा आणि हिंमत असेल तर मैदानात या आणि शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करुन दाखवा असे'' थेट आव्हान ठाकरेंनी अमित शहांना दिले आहे.
हे ही वाचा : World Heart Day 2024: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट यांच्यात नेमका फरक काय? 'हा' आहे हेल्दी हार्ट फॉर्म्युला
''हे येतात उपरे बाजारबुनगे आणि छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला गुलाम बनवण्याची भाषा करतात. शिवसेना संपवण्याची भाषा करतात. अरे या हिंमत असेल तर संपवून दाखवा, बघूया तुमच्या किती पिढ्या उतरतात, अशी टीका देखील ठाकरेंनी यावेळी केली.
हे वाचलं का?
''तुम्हाला शिवसेना का संपवायची. आम्ही तर तुमच्याच सोबत होतो ना. 25 ते 30 वर्ष हिंदुत्व म्हणत तुमच्यासोबत राहिलो. पण हिदुत्ववादी असताना 2014 ला काय घडंल की तुम्ही तुमचा पंतप्रधान बसल्यावर आमच्यासोबत युती तोडलीत. एकनाथ खडसेंनी सांगितलेली ही गोष्ट आहे. खडसेंचा फोन आला, ते म्हणाले ''उद्धवजी आता बस्स झालं, आम्हाला नाही वाटत आता युती पुढे टीकावी''. मी म्हटलं काय झालं. यावर ते म्हणाले ''मला वरुन सांगण्यात आलं आहे आपली युती तुटली''. 15 दिवसात युती तुटल्यानंतर एकटी शिवसेना लढली आणि 63 जागा जिंकून आल्या,असा किस्सा ठाकरेंनी यावेळी सांगितला.
हे ही वाचा : Video : भाषण करताना काँग्रेस अध्यक्षाची तब्येत बिघडली, मंचावर कोसळले..., स्टेजवर काय घडलं?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ल्यावर बांधण्यात आलेल्या पुतळा कोसळल्याची घटना काही महिन्यापूर्वीच घडली होती. या घटनेनंतर आता चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवलात पुतळ्याच्या निकृष्टतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. अशात आता उद्धव ठाकरे यांनी या पुतळा दुर्घटनेवरून शिंदेवर टीका केला आहे. ''मिंधे दाढी खाजवत म्हणतात वाऱ्याने पुतळा पडला, अहो वाऱ्याने तुमची दाढी नाही ना उडत, मग प महाराजांचा पुतळा पडतो बेशरमपणाने सांगता, वाऱ्याने पडला'' अशी टीका ठाकरेंनी शिंदेवर केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT