Ladki bahin Yojana: "पुढच्या वेळी 15 लाखांपासून 1500 रुपये...',लाडकी बहीण योजनेबाबत आदित्य ठाकरे काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mazi Ladki Bahin Yojana Latest Update
Aaditya Thackeray Latest News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

point

लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात

point

आदित्य ठाकरे योजनेबाबत नेमकं काय म्हणाले?

Aaditya Thackeray On Mazi Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. महिल्यांच्या खात्यावर दोन हफ्त्यांचे पैसे जमा झाले असून काही महिलांना तिसऱ्या हफ्त्याची रक्कमही मिळाली आहे. परंतु, शिंदे सरकारच्या या योजनेवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

ADVERTISEMENT

शिंदे आणि भाजपवाले जादूगार

आदित्य ठाकरे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, एकनाथ शिंदे आणि भाजपवाले जादूगार आहेत. त्यांनी सर्वात आधी योजनेचं स्वरुप आणि नाव निश्चित केलं पाहिजे. 15 लाख रुपये मिळतील, असं सरकारकडून सुरुवातीला सांगण्यात आलं. आता ही रक्कम हजारांवर आली आहे. काही दिवसानंतर ही रक्कम 15 रुपये होईल. 

राज ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी

आदित्य ठाकरेंनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लाडकी बहीण योजनेवर टीका केली. ठाकरे अमरावतीत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, ऑक्टोबरचा पहिला हफ्ता दिल्यानंतर जानेवारीत कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीत पैसै नाहीयत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> पुण्यात राडा! लक्ष्मण हाकेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, मद्यधुंद असल्याचा मराठा तरुणांचा दावा

राज्य सरकारचा नियम काय आहे ? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जुलै 2024 पासून महिलांना पैसे दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलं होतं, त्यांना जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून समोर आली आहे. 

ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना एकूण तीन हजार रुपये दिले गेले. पण सरकारच्या नवीन नियमांनुसार, 1 सप्टेंबरपासून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यातच लाभ मिळेल. ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे,  त्यांना जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे 3000 रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना फक्त 1500 रुपये दिले जातील.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Horoscope In Marathi: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस? वाचा सर्व राशींचं भविष्य एका क्लिकवर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक महिलांना 3000 रुपये मिळाले आहेत. 1 सप्टेंबरच्या आधी अर्ज करूनही अनेक महिलांच्या खात्यात पैसै जमा झाले नाहीत. अर्ज मंजूर झाल्यानंतरही या महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाहीय. आधार नंबर बँक खात्याशी लिंक न झाल्याने किंवा अर्जात अन्य त्रुटी असल्याने महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही. पण ज्या महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत, त्यांना योजनेचे पैसे मिळतील.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT