शरद पवारांपासून दूर का झालात? त्यांनी तुम्हाला फसवलं का? सुनील तटकरेंनी सांगितली A to Z स्टोरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sunil Tatkare On Sharad Pawar
Sunil Tatkare Interview In Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुनील तटकरेंनी शरद पवारांवर दिली रोखठोक प्रतिक्रिया

point

शरद पवारांपासून दूर होण्याचं सुनील तटकरेंनी सांगितलं कारण?

point

सुनील तटकरे मुंबई तकच्या चावडीत नेमकं काय म्हणाले?

Sunl Tatkare On Sharad Pawar : एकनाथराव शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर ते सूरत आणि गुवाहाटीला गेले, त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या लक्षात राहतं की, आपल्या हातात सत्ता राहत नाही. राष्ट्रवादीचे 53 चे 53 आमदार जमले, अजितदादांच्या मंत्रालयाच्या दालनात मी होतो. त्या सर्व आमदारांच्या सह्यांचं पत्र शरद पवार साहेबांना दिलं गेलं की, आपण सत्तेत असलं पाहिजे. ते पत्र सुप्रियाताईंना मिळालं आणि त्या म्हणाल्या की, मी साहेबांना सांगते. त्याप्रमाणे साहेबांनी होकार दर्शवला. जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा या तिघांची कमिटी नेमली. पण या गोष्टी घडल्या नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. ते मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमात बोलत होते. 

ADVERTISEMENT

सुनील तटकरे पुढे म्हणाले,  २०२२ मध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाच्या सर्व आमदारांनी ५२ आमदारांनी एकमताने ठरवलं की, आपण सत्तेत असलं पाहिजे. शाहू-फुले आंबडेकरांच्या विचारासांठी एकमेव मी जन्माला आलो आहे, असं सांगणारे सुद्धा त्यात सह्या करणाऱ्यांमध्ये होते. दांभिकपणा किती असू शकतो, त्या सहीने दाखवला आहे. आम्ही जे आहे ते स्वीकारलं.

हे ही वाचा >> भारताच्या 13 वर्षाच्या खेळाडूने इतिहास रचला! 'असा' कारनामा करणारा जगातील सर्वात युवा फलंदाज, सचिनचा विक्रमही...

आम्ही भारतीय जनता पक्षासोबत गेलो, असं नेहमी बोललं जातं. मला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला ठामपणे सांगायचंय की, माझा भाजपसोबत जाण्याचा विचार किंवा निर्णय जूनमध्ये 2023 ला आला असा नाही. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. निकाल हाती यायचे होते, त्याआधीच आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही सरकारमध्ये सहभागी होणार होतो, असंही तटकरे म्हणाले. 

हे वाचलं का?

तटकरे म्हणाले, मी मागेही दावा केला होता की, 2009 एमव्हीए, देशात यूपीए 2 म्हणून लोकसभेला निवडणूक होत होती, त्यावेळी सुद्धा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणूक लढवायच्या. 16-16-16 असा सुद्धआ फॉर्म्युला 2009 मध्ये ठरला होता. शिवसेनेनं भाजपमधून बाजूला जायचं आणि आम्ही काँग्रेसमधून बाजूला जायचं, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित निवडणुका लढवायच्या, अशी पक्षांतर्गत चर्चाही झाली होती.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शिवसेना किंवा भाजपकडे जाण्याची चर्चा २००९ ते २०१६ पर्यंत होती. मी भाजपच्या नेत्यांशी वाटाघाटी केल्या. राज्यपातळीवर आमच्या लोकसभेच्या जागांचं वाटप झालं. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Optical illusion Test : बर्फाळलेलं झाड की सिंह? गोंधळच उडालाय ना! क्लिक केल्यावर खरं उत्तर मिळेल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT