हर्षवर्धन पाटलांच्या मुलीच्या Whatsapp DP मुळे भाजपमध्ये भूकंप, पाहा कोणता आहे फोटो?

मुंबई तक

ADVERTISEMENT

harshvardhan patil will join ncp sharad pawar group meet silver oak bunglow today contested indapur vidhan sabha
हर्षवर्धन पाटलांची पवारांसोबतची बैठक पडली पार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हर्षवर्धन पाटलांची पवारांसोबतची बैठक पडली पार

point

तब्बल पाऊण तास दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा

point

हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार?

Harshvardhan Patil News : वसंत मोरे, बारामती : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी होल्डवर ठेवलेल्या पक्षबदलाच्या निर्णयाला आज गती दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज (गुरुवारी) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘सिल्वर ओक’या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तब्बल पाऊण तासांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) सिल्वर ओकवरून निघाले आहेत. यानंतर हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाच्या निर्णयावर जसेही शिक्कामोर्तब झाले तसे हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता (Ankita Patil) आणि पुत्र राजवर्धन यांनी ‘तुतारी वाजवणारा माणूस’असे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील तुतारी हातात तुतारी घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काही तासांत त्यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. (harshvardhan patil will join ncp sharad pawar group meet silver oak bunglow today contested indapur vidhan sabha) 

गेल्या अनेक दिवसांपासून हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेतील, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र या पक्षप्रवेशाला गती मिळाली नव्हती. त्यात आज हर्षवर्धन पाटील यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली होती. या चर्चेनंतर हर्षवर्धन पाटील सिल्व्हर ओकवरून निघाल्यानंतर त्यांचे पुत्र राजवर्धन पाटील आणि कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी तुतारीचा स्टेटस ठेवला आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

हे ही वाचा : Shiv Sena UBT: 'असुरांचा संहार कराया, मशाल हाती दे...', ठाकरेंच्या शिवसेनेचं नवं गाणं ऐकलं का?

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिकिटासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांची चांगलीच कोंडी झाली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाटलांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ज्याचा आमदार त्याची जागा असे सुत्र महायुतीत ठरल्याने इंदापूरची जागा अजित पवारांच्या नेतृत्वालाच जाईल हे स्पष्ट झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी आशा सोडली होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : चौथ्या हप्त्याची तारीख ठरली! 'या' दिवशी खात्यात खटाखट येणार पैसे

दरम्यान राजकारणात महत्वाकांक्षा असतात. हर्षवर्धन पाटलांचं चुकीचं सूरू आहे असं मी म्हणणार नाही. पण माझं म्हणण आहे की, एका पक्षात राहण्याचे समाधान वेगळं असतं, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप सोडण्याचे संकेत दिले आहेत.

हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे. आता उद्याच पत्रकार परिषद घेऊन ते पक्षप्रवेशाची घोषणा करतील. तत्पुर्वी अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी त्यांच्या व्हाॅटसअॅप स्टेटसवर तुतारीचा वाजवणारा माणूस हा फोटो ठेवल्याने हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे.  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT