Amit Shah : "शरद पवारांच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम...", अमित शाहांचं विरोधकांवर शरसंधान
Amit Shah On Sharad Pawar And Uddhav Thackeray : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. शाहा शिर्डीत भाजपच्या महाअधिवेशनात बोलत होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अमित शाहांची विरोधकांवर घणाघाती टीका

"20 फूट जमिनीत गाडण्याचं काम..."

अमित शाहा भाजपच्या अधिवेशनात नेमकं काय म्हणाले?
Amit Shah On Sharad Pawar And Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या महाविजयानंतर पहिल्यांदाच आम्ही सर्व एकत्रित आलो आहोत. तुम्हाला सर्वांना माहिकी नाही की, तुम्ही किती मोठं काम केलं आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. एवढ्या मोठ्या संख्येत आमचे कार्यकर्ते आमदार, मंत्री झाले. आमच्यासोबतच खरी शिवसेना आणि खऱ्या एनसीपीलाही विजय प्राप्त झाला. पण महाराष्ट्राच्या विजयाचे अनेक मायने आहेत. 1978 पासून शरद पवारांनी फोडाफोडीचे राजकारण सुरु केलं होतं. त्याला 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम तुम्ही केलं आहे, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. तसच शाहांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंनी 2019 ला आमच्यासोबत जो दगाफटका केला होता, विचारधारा सोडली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धातांना सोडलं होतं. खोटं बोलून मुख्यमंत्री बनले होते, ते उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवण्याचं काम तुम्ही केलं आहे", असं विधान करत शाहांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. शाहा शिर्डीत भाजपच्या महाअधिवेशनात बोलत होते.
हे ही वाचा >> Dhananjay Deshmukh : 'वाल्मिक कराडला मकोका आणि खुनाच्या गुन्ह्यात...'; धनंजय देशमुख टॉवरवर चढून करणार आंदोलन
अमित शाहा जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, 1978 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्र अस्थिरतेचं शिकार बनलं. त्या अस्थिरतेच्या राजकारणाला समाप्त करून स्थिर मार्गाने चालण्याचं काम मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देऊन तुम्ही केलं आहे. लोकसभेनंतर महाराष्ट्रात आमचा विजय होईल, असं विरोधकांना वाटत होतं. त्यांच्या स्वप्नांचं चक्काचूर करण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलं आहे.
हे ही वाचा >> CM Devendra Fadnavis : "लाडक्या बहिणींना मदत करतोय आणि...", शिर्डीत CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधानं!
मी जेव्हा आलो होतो, तेव्हा साडेनऊ हजार कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. मी म्हटलं होतं, अनेक निवडणुका अशा असतात, ज्या राज्यांवर परिमाण करतात. काही निवडणुका अशा असतात, ज्या देशातील राजकारणाला बदलून टाकतात. माझं म्हणणं लक्षात ठेवा, 25 वर्षानंतर इतिहास साक्ष बनेल, महाराष्ट्राचा महाविजय देशाच्या राजकारणाला पुन्हा पटरीवर आणण्याचं काम केलं आहे, असंही अमित शाहा म्हणाले.