Chhagan Bhujbal: ओबीसींच्या बैठकीत काय घडलं... भुजबळ एवढे का संतापले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ओबीसींच्या बैठकीत काय घडलं... भुजबळ एवढे का संतापले?
ओबीसींच्या बैठकीत काय घडलं... भुजबळ एवढे का संतापले?
social share
google news

Chhagan Bhujbal and OBC Reservation: मुंबई: ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी अत्यंत आक्रमक भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा तशाच स्वरुपाची भूमिका ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत घेतली. ज्यानंतर बैठकीत त्यांना  ओबीसी आरक्षणाबाबत काही आश्वासनं देखील देण्यात आली. पण बैठकीनंतर पत्रकार परिषद घेताना छगन भुजबळ हे काहीसे संतापलेले दिसून आले. (what exactly happened in the obc meeting with chief minister eknath shinde why was chhagan bhujbal so angry)

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्याप्रमाणे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले होते त्याच प्रमाणे ते वडीगोद्रीला जाऊन लक्ष्मण हाकेंची भेट घेणार का? असा सवाल जेव्हा भुजबळांना विचारण्यात आला तेव्हा ते काहीसे संतापलेले दिसून आले. 

'आम्ही मंत्रिमंडळ जे.. जवळजवळ 7-8 मंत्री आहोत... ते जाणार आहोत. आम्ही जे आहे ते बोलू त्यावर त्यांचा विश्वास बसेल कारण मी तिथे आहे त्यामध्ये.. काळजी करू नका.. अहो छगन भुजबळ बोलतोय.. मी ओबीसीचा नेता आहे.. मी ज्या वेळेला निरोप घेऊन जातोय. त्या वेळेला माझे ते लोक आहेत.. ते विश्वास ठेवतील..' असं भुजबळ यावेळी म्हणाले..

'जातीचा दाखला आधारकार्डशी जोडणार...' ओबीसींच्या बैठकीनंतर भुजबळ नेमकं काय म्हणाले.. 

'वडीगोद्रीला लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे दोघे जण 9 दिवस उपोषण करत आहेत. त्यांच्याच बरोबर मंगेश ससाणे हे पुण्याला उपोषणाला बसले आहेत. त्यांनी ते उपोषण सोडावं म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी तीन-चार मंत्री महोदयांना त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि चर्चेला येण्याचं आमंत्रण दिलं होतं.'

हे वाचलं का?

हे ही वाचा>> OBC Reservation : पंकजा मुंडेंचं आतातरी मुख्यमंत्री शिंदे ऐकणार का?

'त्यानुसार आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मी स्वत: अतुल सावे, गिरीश महाजन, उदय सामंत, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर विशेषत: वडीगोद्री आणि पुण्याहून आलेले कार्यकर्ते हे सगळे तिथे हजर होतो.' 

'या बैठकीत खूप चर्चा झाली आणि शेवटी असं ठरलं की, मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की, खोटी सर्टिफिकेट्स कोणालाही दिली जाणार नाहीत. कुणबी दाखले आम्ही तपासू.. खोटी सर्टिफिकेट देणे आणि घेणे हे दोन्हीही गुन्हेगार असणार..  त्याप्रमाणे कारवाई होईल.' 

ADVERTISEMENT

'सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही. ती कायद्यात देखील अजिबात बसणार नाही. कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही.' 

ADVERTISEMENT

'अनेक वेळेला काही लोक आहेत ते वेगेवेगळे दाखले काढून वेगवेगळ्या ठिकाणचे फायदे घ्यायला पाहतात. म्हणजे ओबीसीतून, ईडब्ल्यूएसमधून.. तर हे सगळे दाखले आहेत ते आधारकार्डला जोडण्याचं काम करण्याची चांगली एक कल्पना आली आहे. तिचा आम्ही स्वीकार करू.. जेणेकरून जो कोणी मनुष्य असेल ती व्यक्ती एकाच योजनेचा फायदा घेऊ शकेल.' 

'मंत्रिमंडळात जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी जशी समिती आहे तशी ओबीसी-भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल.' 

'सगे-सोयरेच्या बाबतीत बराच उहापोह झाला.. आम्ही त्यांना सांगितलं की यात खूप त्रुटी आहेत. ओबीसी असेल तर त्याला प्रमाणपत्र कसं द्यावं, जात पडताळणी कशी करावी.. पूर्ण माहिती असलेलं पुस्तकच आहे. त्याप्रमाणे सगळ्याची पूर्तता करून सर्टिफिकेट देण्यात येतात..' 

हे ही वाचा>> Pankaja Munde : पंकजा मुंडे खासदार होणार? भाजपमध्ये हालचाली सुरू

'हे जे आहे सगे-सोयरेची गरजच काय? असं आम्ही म्हटलं.. जर एक कागदपत्र आपल्याकडे आहे. 20-25 वर्ष आहे.. त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही. तर दुसरं असं सगेसोयरे करण्याची गरज नाही.' 

'त्यांनी (मुख्यमंत्री) सांगितलं जरूर.. तुम्ही माहिती द्या.. आम्ही सांगितलं की, आहे त्यामध्ये देखील काही त्रुटी आहेत. आमच्या वकिलांचा देखील आम्ही सल्ला घेत आहोत. त्यांनी सांगितलं की, आणून द्या आमच्याकडे..' 

'अधिवेशन काळामध्ये.. सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन सगेसोयरेबाबत काय करायचं याचा निर्णय आम्ही घेऊ कशाप्रकारे हा प्रश्न सोडवायचाय याचा निर्णय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सोडवू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.' 

'त्यांनी हेही सांगितलं की, आम्ही मराठा समाजावर अन्याय करणार नाही. त्याचबरोबर विमुक्त, भटक्या विमुक्त आणि ओबीसी या समाजावर देखील अन्याय करणार नाही. करू देणार नाही अशी आमची भूमिका आहे. वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीनंतर सुद्धा लहान समाजाच्या घरांवर हल्ले झाले. बदला घेण्यात आला.. अजूनही ते प्रकार त्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत. त्याबाबत कडक कारवाई करू असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.' 

'काही मंत्री जे आहेत आम्ही पुण्याला आणि वडीगोद्रीला जाऊन समजून सांगणार आणि त्यांना विनंती करणार की, तुम्ही उपोषण समाप्त करावं. त्यानंतर जी सर्वपक्षीय बैठक होईल त्यात तुम्हाला भाग घेता येईल.' 

'आम्ही मंत्रिमंडळ जे.. जवळजवळ 7-8 मंत्री आहोत... ते जाणार आहोत. आम्ही जे आहे ते बोलू त्यावर त्यांचा विश्वास बसेल कारण मी तिथे आहे त्यामध्ये.. काळजी करू नका..' 

'अहो छगन भुजबळ बोलतोय.. मी ओबीसीचा नेता आहे.. मी ज्या वेळेला निरोप घेऊन जातोय. त्या वेळेला माझे ते लोक आहेत.. ते विश्वास ठेवतील..' 

'असं आहे कोणाचंही राजकीय करिअर उध्वस्त जे आहे ते जनता असते.. एका-दुसऱ्या माणसाचं ते काम नाही.. आणि जनतेचे आमच्याकडे भरपूर आशीर्वाद आहेत.. काळजी करण्याचं कारण नाही..' 

असं म्हणत छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीत नेमकं काय-काय घडलं याची माहिती दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT